ताज्या बातम्याराज्यविदेशसातारा

निर्माणाधीन बोगद्याचा 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना, 36 मजूर अडकले

उत्तराखंड ः उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्याराहून डंडालगावपर्यंत जाणाऱ्या एका निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. तब्बल 36 मजूर बोगद्यात अडकल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, प्रशासनाने या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली आहे. भूस्खलनामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

जिल्हा प्रशासनाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मजुरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. उत्तर काशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी या घटनेबाबत सांगितले की, बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित आहेत. तसेच त्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडरदेखील आहेत. त्याचबरोबर एक ऑक्सिजन पाईपही बोगद्यात पोहोचवली आहे.
अर्पण यदुवंशी म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. बोगद्याचा मलबा (डेब्रिज) हटवण्याचं काम सुरू आहे. तसेच उभ्या ड्रिलिंग मशीन्सची (खोदकाम करणारी यंत्रसामग्री) व्यवस्था करण्यात आली आहे.

बोगद्याच्या बाहेर पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेता येईल. तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करता यावेत यासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close