
कराड : ओंड ता कराड गावच्या हद्दीत कराड चांदोली रस्त्यावर शनिवारी सायंकाळी रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला दुचाकी स्वाराने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओंड येथील वीजतरण कंपनीच्या कार्यालयासमोर रामचंद्र भगवान पोळ (वय ४२) हे रस्ता ओलांडत असताना एका दुचाकी स्वाराने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते जागेवरच मृत झाल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत कराड तालुका पोलिसात चौकशी केली असता रात्री उशिरापर्यंत तेथे अपघाताची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.