
कराड ः येथील चर्च परिसरात गांजा विक्री करत असणाऱ्या दोघांना शनिवारी रात्री कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पंचवीस हजार रूपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला.
पवन सुभाष डावरे (वय 18, रा. मुजावर कॉलनी, कराड), यासर कादर शिकलगार (वय 20, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी कराड शहर परिसरात अंमली पदार्थाविरोधात मोहीम राबविण्याच्या सूचना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कराड शहर चर्च परिसरात दोघेजण गांजा विक्री करत असल्याची माहिती राजू डांगे यांना गोपनीय बातमीदाराकडून समजली. त्या माहितीच्या आधारे राजू डांगे यांच्या पथकाने सापळा रचून पवन डावरे व यासर शिलकगार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पंचवीस हजार रूपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, अझर शेख, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुखयांनी केली.