ताज्या बातम्याराजकियराज्य

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचे 10 धडाकेबाज निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.

उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात आले आहे.

पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा
इतर

लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.
शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
राज्यात 121 टक्के पेरण्या
राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close