
कराड : कराड तालुक्यात उत्खनन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उत्खनन करणाऱ्यांचे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे आहेत. अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन कमी प्रमाणात रॉयल्टी काढून जास्तीचे उत्खनन करण्यात या व्यवसायिकांचा हातखंडा आहे. कराड तालुक्यातील डोंगरपट्ट्याच्या भागात उत्खनन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकांकडून जास्तीचा हप्ता वाढवून मिळावा यासाठी काही ना काही तांत्रिक अडचणी आणून त्यांच्या व्यवसायावर गंडांतर आणण्याचे काम सध्या तहसील कार्यालयातून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयामध्ये तलाठी, मंडल अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तलाठी व मंडल अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व क्रेशर च्या लाईट मीटर चा ग्राहक क्रमांक व केमिकल कोणाच्या नावावरती आहे याबाबतची माहिती घेऊन येण्याबाबत कळवले असल्याची माहिती मिळून आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार क्रेशर व्यवसायासाठी लाईट मीटर घेणे आवश्यक असते. त्यासाठी 150 kw खाली असेल तर Lt ट्रांसफार्मर म्हणजेच लो टेन्शन ट्रान्सफॉर्मर म्हणतात तसेच 150 वरती Ht ट्रान्सफॉर्मर म्हणजे हाय टेन्शन ट्रान्सफॉर्मर म्हणतात यातील कोणताही एक ट्रांसफार्मर क्रेशर व्यवसायासाठी बसवला जातो.
क्रेशर व्यवसायासाठी अथवा कोणत्याही व्यवसायासाठी तसेच घरातील कोणतेही कनेक्शन घेतलेल्या कनेक्शन ला ग्राहक क्रमांक दिलेला असतो. या ग्राहक क्रमांक वरून कनेक्शन कोणाच्या नावावरती आहे, कनेक्शन केव्हा घेण्यात आलेले आहे, या कनेक्शन वरती लोड किती सेक्शनचा आहे, हे समजते तसेच या मीटर वरती सिरीयल नंबर असतो ते मीटर कोणत्या कंपनीचे आहे याबाबतचे संपूर्ण डिटेल्स मिळू शकते.
लाईट मीटर चा ग्राहक क्रमांक व ते मीटर कोणाच्या नावावरती आहे हे समजल्यानंतर त्याने मीटर केव्हा घेतले आहे त्याचा वापर मीटर घेतल्यापासून आजपर्यंत किती करण्यात आलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकते.
क्रमशः
पुढील भागात – या रणनीतीचा फायदा नक्की कोणाला