क्राइमराज्यसातारा

कोरेगाव यात्रेत पिस्टल घेऊन दहशत माजवणाऱ्यास अटक

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई ः पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

कराड ः कोरेगाव ता. कराड गावच्या यात्रेमध्ये हातात पिस्टल घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण 70 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
निखील शशिकांत थोरात (वय 25, रा. नांदलापूर, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी लोकसभा निवडणुक प्रक्रिया 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
कोरेगांव, ता. कराड येथे गांवचे वार्षीक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिस्टल घेवून वावरत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खास खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी सुचना देवून कोरेगांव, ता. कराड या गांवचे परिसरात गस्त घालून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार दिनांक 25 मे 2024 रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने कराड जवळच्या कार्वे तसेच कोरेगांव परिसरात गस्त सुरू ठेवली होती. यादरम्यान , खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीशी मिळताजुळता एक संशयित युवक कोरेगांव बाजूकडून येणारे रस्त्याने पायी चालत येत असताना दिसला. त्याचा संशय आलेने त्यास ताब्यात घेवून पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 70 हजार रुपये किंमतीचे 1 देशी बनावटीचे पिस्तूल व 1 जिवंत काडतूस किंमत असा एकुण 70 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याचे ताब्यात मिळून आला. त्यामुळे त्या युवकाविरुध्द कराड तालुका पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणें, पोउनि, विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा. विजय कांबळे, संजय शिर्के, अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील स.पो.नि. अभिजीत चौधरी, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळी यांच्या पथकाने केली.

एलसीबीकडून दीड वर्षात 87 पिस्तुले जप्त
सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर 2022 पासून ते आजपर्यंत 87 देशी बनावटीची पिस्टल, 3 बारा बोअर बंदूक, 1 रायफल, 197 जिवंत काडतुसे, व 385 रिकाम्या पुंगळया, 1 रिकामे मॅग्झीन जप्त करण्यात आली आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close