ताज्या बातम्याराज्यशैक्षणिक

विद्यानगर येथील बेकायदा सुरू असलेल्या अकॅडमीबाबत सर्व राजकीय पक्षासह २२ संघटना आक्रमक

कराड : कराड शहराला शैक्षणिक क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे, आजही विद्यानगरी परिसरात २२ हजारहून अधिक विद्यार्थी विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्यभरातून येऊन शिक्षण घेत आहेत मात्र या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा उद्योग काही बेकायदा सुरू असलेले अकॅडमी चालक करीत असून पालकांच्याकडून लाखो रुपयांची बेसुमार फी घेऊन मोठी फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहेत. अक्षरशा पत्र्याच्या खोलीत अथवा फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे व शिक्षणाची कोणतीही पदवी नसलेले शिक्षक पालकांच्या कडून अक्षरशः लाखो रुपये फी गोळा करून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा उद्योग करीत आहेत. कराड विद्यानगर परिसरात सुमारे ८० अकॅडमी असून या अकॅडमी चालकांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नाही अथवा शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही यामुळे मोठी फसवणूक होत असून या विरोधात आज कराड शहर व तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाई या विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यासह रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना,शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हा सैनिक फेडरेशन, पालवी महिला मंच, शैक्षणिक क्रांती संघटना, क्रीडा प्रशिक्षक संघ अशा २२ विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन कराड विद्यानगर परिसरात सुरू असलेल्या बोगस अकॅडमी वर कारवाई करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी  बिपिन मोरे यांना निवेदन दिले.
दरम्यान कराड विद्यानगर येथील बेकायदा अकॅडमीच्या बाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close