क्राइमराज्यसातारा

सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड शहर पोलीस ठाण्यात सात खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल

कराड  : व्याजाने दिलेल्या पैशाच्या व्यवहारापेक्षा जास्त पैशाचा खाजगी सावकारांनी तगादा लावल्याने या त्रासाला कंटाळून येथील युवकाने झोपेच्या जास्त गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सात खाजगी सावकारांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्या खासगी सावकारी प्रतिबंधीत कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

शुभम ढेब उर्फ सोनू पवार, रा. सात शहीद चौक कराड. शुभम मस्के, रा. सात शहीद चौक, कराड. ओंकार गायकवाड रा. बैल बाजार रोड, मलकापूर. निलेश पाडळकर, सध्या रा. सात शहीद चौक, कराड, अथर्व चव्हाण, रा. उंब्रज. दादा म्हस्के, रा. सात शहीद चौक कराड, तेजस चव्हाण, रा. आझाद चौक कराड. अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी सातपेकी चोघांना अटक झाली आहे. शुभम उर्फ सोनू ढेब-पवार, शुभम मस्के, दादा उर्फ जीवन मस्के, व तेजस चव्हाण अशी अटक झालेल्याची नावे आहे. त्यांना एक जानेवारी अखेर पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणी युगल दिलीप सोळंकी (वय 24) रा. शनिवार पेठ कराड असे खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असून पोलिसांनी तेथून त्याची फिर्याद नोंद करून घेतली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, युगल सोलंकीने २० डिसेंबर रोजी त्याच्या राहत्या घरात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गोष्ट लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला त्वरीत रूग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर अतीदक्षात विभागात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा त्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. त्यानुसार सात जणांवर गुन्हा दाखल असून त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. युगल ने संबधितांकडून जुन २०२३ पासून खासगी सावकारी व्याजाने पैसे घेतले. त्यापैकी आजपर्यंत १२ लाख रुपये दिले आहेत. तरीही संबधित सावकार त्याच्याकडे पैसे मागत होते, त्याला दुकानात घरी जावून धमकी देत होते. युगलने वारंवार त्यांना घेतलेले पैसे परत दिले आहेत, असे सांगून व्यवहार संपल्याचेही स्पष्ट करत होता. युगलने शुभम मस्केला १२ लाख रुपये व्याजाचे दिले आहेत. तुम्ही मला मुद्दल चार लाख ६१ हजार दिली होती. शुभम ढेबला ऑनलाईन वेळोवेळी रोख रक्कम परत केली आहे. त्याचप्रमाणे अन्य खासगी सावकरही दुकानात येवून तसचे फोनवरून वारंवार शिवीगाळ दमदाटी करीत होते. रक्कम ही लागलीच दे नाहीतर तुझे काही खरे नाही. असे बोलत होते. युगलने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याला चार ६१ हजार रूपये दिले. ऑगस्ट 2023 मध्ये वेळोवेळी दोन लाख ५० हजार रुपये व सप्टेंबर २०२३ मध्ये चार लाख व पुन्हा पाच लाख घेतले होते. दिले होते. त्यातील निलेश पाडळकरचा हप्ता दर १५ दिवसाला

५० हजार होता. एक दिवस जरी उशिरा झाला तरी दिवसाला १० हजारांचांये दंड घेत होता. अथर्व चव्हाणला दोन लाख ५० हजार दिले होते. तरीसुध्दा तो दुकानामध्ये येवून तसेच फोनकरुन शिवीगाळ दमदाटी करीत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दोन लाख व १५ दिवसाला ४० हजार व्याजाने दिले होते. त्यांना युगलने दोन लाख ८० हजार रोखीने परत केले. तरिही त्या लोकांचा होणारा त्रास असहाय्य झाल्याने युगलने डिप्रेशनमध्ये जावून आत्महत्या करायचा विचार केला. त्याने २० डिसेंबरला दुपारी राहते घरी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close