
पाटण : राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शारिरीक तपासणी करुन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून योग्य तो सल्ला व आवश्यक ते औषधोपचार करुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुरुवार दि. 17 नोव्हेंबर,2023 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 या वेळेमध्ये दौलतनगर, ता.पाटण येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावेतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर,ता.पाटण येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबीरामध्ये स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी व प्रमाणपत्र वितरण, अस्थिरोग तपासणी व अपंगत्व प्रमाणपत्र, कान, नाक, घसा तपासणी, त्वचारोग तपासणी, एन.सी.डी.विभाग, रक्तदाब, ब्लड शुगर, कॅन्सर तपासणी, महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी, रक्तदान शिबीर, क्ष किरण तपासणी, इ.सी.जी. तपासणी, रक्त लघवी तपासणी या आरोग्यविषयक तपासण्या होणार आहेत. रुग्णाच्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक ती तपासणी करण्यात येऊन त्याचा आजार बरा होण्यासाठी आवश्यक तो प्राथमिक औषधोपचार करुन डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्य विषयक योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. तसेच संबंधित रुग्णांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या सर्व रोग निदान शिबीराचा लाभ पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.