
कराड तालुक्यातील एकात्मिक नागरी सुविधा (सेतू ) केंद्राची मुदत संपल्यामुळे नवीन ठेकेदार नेमणे कामी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ई – निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये रिद्धी कार्पोरेटिव्ह सर्व्हिसेस लिमिटेड अहमदाबाद या कंपनीस कराड सेतू चालवण्याचा ठेका देण्यात आला होता.
या अनुषंगाने शेखर सिंह अध्यक्ष जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी दि. 1/1/2022 ते दि. 31/12/2024 या कालावधीसाठी कार्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीने कराड सेतू केंद्राचा ठेका चालवण्यासाठी दि. 15/12/2021 रोजी आदेश काढलेला आहे.
तसेच प्रशांत आवटे सचिव जिल्हा समिती तथा उपजिल्हाधिकारी सातारा यांच्या सहीनिशी असलेल्या दि. 4/7/2022 च्या कार्यारंभ आदेशामध्ये कार्यारंभ आदेशाच्या दिनांकापासून पुढील 3 वर्ष रिद्धी कार्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीस कराड सेतू केंद्र चालवण्याचा ठेका दिला असल्याचे दिसून येत आहे.
तसेच प्रशांत आवटे सचिव जिल्हा समिती तथा उपजिल्हाधिकारी सातारा व विनायक विश्वनाथ जंगम व्यवस्थापक रिद्धी कार्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड अहमदाबाद या दोघांच्या मध्ये कराड सेतू केंद्र चालवण्यासाठी दि. 5/5/2022 रोजी झालेल्या करारनाम्यात दि. 1/5/2022 ते दि. 30/4/2025 पर्यंतची मुदत दिल्याचे दिसून येत आहे.
मुळात दि. 4/7/2022 रोजी काढण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पाहिले तर दि. 4/7/2022 पर्यंत पात्र ठेकेदार यांचे करारनामा, बँक गॅरंटी, व इतर बाबी प्रलंबित ठेवल्या होत्या तर प्रशांत आवटे सचिव जिल्हा सेतू समिती तथा उपजिल्हाधिकारी सातारा व विनायक विश्वनाथ जंगम व्यवस्थापक रिद्धी कार्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीमध्ये कराड सेतू चालवण्यासाठी दि. 5/5/2022 रोजी झालेला करारनामा कायदेशीर व योग्य आहे का?
मग शेखर सिंह अध्यक्ष जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी दि. 15/12/2021 रोजी काढलेल्या आदेशामध्ये दि. 1/1/2022 ते दि. 31/12/2024 पर्यंत कराड सेतू केंद्र चालवण्याचा ठेका दिला आहे तर प्रशांत आवटे उपजिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी असलेल्या दि. 4/7/2022 रोजी दिलेल्या कार्यारंभाच्या आदेशापासून पुढील 3 वर्ष तसेच प्रशांत आवटे यांनी दि. 5/5/2022 रोजी करून दिलेल्या करारनाम्यात दि. 1/5/2022 ते दि. 30/4/2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
मग दि. 1/1/2022 ते दि. 31/12/2024 ची का दि. 4/7/2022 ते पुढील तीन वर्ष म्हणजे दि. 3/7/2025 ची का केलेल्या करारनाम्यानुसार दि. 1/5/2022 ते दि. 30/4/2025 या तिन तारखे पैकी नक्की कोणत्या तारखेस कराड सेतू केंद्राच्या ठेक्याची मुदत संपणार आहे याबाबत निर्णय कोण घेणार आहे हे पाहण्यासाठी कराड तालुक्यातील जनता उत्सुक आहे.