राजकियराज्यसातारा

आ. मनोज घोरपडे यांच्या नागठाणे येथील जनता दरबारात 100 हून अधिक तक्रारींचा जागीच निपटारा

कराड ः कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली नागठाणे येथील वरद मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये 100 वर तक्रारींवर जागीच फैसला झाला. तर दिडशेवर अर्जही दाखल झाले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या जनता दरबारामध्ये कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे व वर्णे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील नागरिकांच्या समस्या व प्रश्नांवर चर्चा होऊन जागेवरच प्रश्न सुटल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सदर  जनता दरबारा मध्ये नागठाणे व अपशिंगे मंडळातून एकूण 398 रहिवाश्याना उत्पन्नाचे व जातीचे दाखले देण्यात आले. पुरवठा विभागास एकूण 32 अर्ज प्राप्त झाले असून 17 अर्ज तात्काळ निकाली काढण्यात आले.नागठाणे येथिल 15 कातकरी लोकांना जातिचे दाखले, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड याचे वाटप करण्यात आले. नागठाणे व अपशिंगे मंडलाच्य वतिने फेरफार अदालत आयोजित करण्यात येऊन त्यामध्ये  नागठाणे व अपशिंगे मंडलाधिकारी यांनी एकूण 35 फेरफारला मंजुरी दिली व 2 तक्रार रजिस्टर निवारण केले आहे तसेच 6 क वारस नोंदीची 15 प्रकरणे मंजूर करण्यात आली. या जनता दरबार मध्ये एकुण 398 लोकांना महसूल विभागातिल विविध योजनांचा लाभ देण्यात आला सर्व विभागांनी जनता दरबार मध्ये येणाऱ्या सर्व लोकांच्या अडचणीचे निरसन करण्यात आले.

प्रलंबित अर्जावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिले आहेत. हायवे वरील विचारलेल्या प्रश्नस उत्तर देताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले नागठाणे येथे 5.5020 मीटरचा एक सोबत 5.5010 मीटरचे दोन अंडरपास निसराळे फाटा येथे 5.5020 मीटरचा एक अंडर पास काशीळ येथे 5.5020 मीटरचा एक अंडरपास करण्यात येणार आहे.
यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतिश बुद्धे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मुलाणी  यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, बोरगावचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख तसेच ॲड. धनाजी जाधव, संजय घोरपडे, विजया गुरव, राजेंद्र ढाणे, अंजली जाधव, युवराज साळुंखे, श्रीरंग गोरे, दत्तात्रेय ढाणे, वैभव यादव, सुरेश यादव, गणेश जाधव, नंदकुमार पाटील, गौतम पवार, अशोक ढाणे, दिलीप मोरे, अजित साळुंखे, नंदू नलावडे, आनंदराव जाधव आदी नागठाणे, वर्णे जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

मी तर जनतेचा सेवक
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो आहे. परंतु मी आमदारा बरोबर जनतेचा सेवक आहे. अधिकाऱ्यांनो कामात हलगर्जीपणा करू नका. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवा. त्याचबरोबर जे कंत्राटदार कामाचा दर्जा सुधारत नाहीत त्यांचा काळ्या यादीत समाविष्ट करा. असा इशारा आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close