
कराड ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात मतदारासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. याची माहिती शुक्रवारी कराड उत्तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण व दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पवार व स्मिता पवार उपस्थित होते.
विक्रांत चव्हाण म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये 339 मतदार केंद्र आहेत. नोंदणीकृत मतदारांची संख्या 296945 इतकी आहे. निवडणूक प्रक्रीया राबवण्यासाठी मतदान केंद्रांवर एकूण 2504 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक महिला कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचारी जिल्हयातील इतर तालुक्यातून येणार आहेत.
कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण दि. 6 व 7 एप्रिल रोजी समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन सोसायटी येथे देण्यात आले. तर दुसरे प्रशिक्षण दि. 26 व 27 एप्रील रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, सैदापूर कराड येथे घेण्यात आले. गृह मतदानासाठी संमती दिलेले 85 वर्षाच्या वरील वृध्द मतदारांची संख्या 266 इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 32 इतकी आहे. यापैकी 242 मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
टपाली मतदान मतदारचे घरी जावून 1 मे ते 4 मे कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारसंघामध्ये एकूण राखील 10 मतदान पथके तयार करण्यात आलेली आहेत. या प्रक्रीयेवर लक्ष ठेवण्यासाठी 10 मायक्रो ऑब्जरवर व व्हिडीओग्राफर, पोलिस यांची नियुक्ती केली आहे.
मतदार संघामध्ये कराड-विटा रोड, कराड पुसेसावळी रोड, शामगाव, तासवडे टोलनाका, रहिमतपूर, वाठार किरोली रोड, कराड-विटा रोड, चोराडे फाटा या पाच ठिकाणी सहा स्थिर निगराणी पथके कार्यरत आहेत. सदर पथकांनी दि. 12 ते 30 एप्रिल या कालावधीत 30724 एवढी वाहने तपासली. तसेच या मतदार संघामध्ये पाच भरारी पथक कार्यरत आहेत. मतदान प्रक्रीयेकरीता ईव्हीएम यंत्र तयार करण्याची प्रक्रीया दि. 29 व 30 एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आली. मतदार संघामध्ये आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असून आतापर्यंत सीव्हीजील ॲपवर तीन किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. स्वीप कक्षाकडून मतदारसंघामध्ये जास्ती जास्त मतदान होण्यासाठी मानवी साखळी, पथनाट्य, सेल्फी पॉईंट, स्वाक्षरी माहिम, विविध पोस्टर्स व बॅनर्सव्दारे आतापर्यंत 26 गावात जनजागृती करण्यात आली आहे.
अतुल म्हेत्रे दक्षिण मतदार संघातील मतदान पूर्व तयारीची माहिती देताना म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतदार संख्या 3 लाख 2 हजार 580 ऐवढी आहे. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 54 हजार 666 तर स्त्री मतदार 1 लाख 47 हजार 887 आहे. इतर 27 मतदार आहेत. सैनिक मतदार 658 आहेत.
या मतदार संघात 309 मतदान केंद्र आहेत व 4 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. एकूण 313 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर 309 बीएलओ कार्यरत आहेत.
7 मे रोजी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे आणि मतदांनाची टक्केवारी वाढावी याकरीता वेगवेगळया मतदान केंद्राची रचना करण्यात आली आहे. महिला मतदान केंद्र सैदापूर, युवक मतदान केंद्र कराड व मलकापूर, अव्दितीय मतदान केंद्र 121 कराड, दिव्यांगव्दारा संचलित मतदान केंद्रः 108 कराड.
संवेदनशिल मतदान केंद्र म्हणून सवादे, काले, नांदगाव व शिवनगर (रेठरे बु.) नोंदली गेली आहेत.
एकूण 313 मतदान केंद्रावर 348 केद्राध्यक्ष, 348 सहा. केंद्राध्यक्ष, 767 इतर मतदान अधिकारी, 343 शिपाई, 20 सुक्ष्म निरीक्षक, 8 शिघ्र कृती दल नियुक्त करण्यात आले आहे. इत्यादी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. 186 मतदान केंद्राचे वेब कास्टींगव्दारे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
एकूण 313 मतदान केंद्रावर 348 केद्राध्यक्ष, 348 सहा. केंद्राध्यक्ष, 767 इतर मतदान अधिकारी, 343 शिपाई, 20 सुक्ष्म निरीक्षक, 8 शिघ्र कृती दल नियुक्त करण्यात आले आहे. इत्यादी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. 186 मतदान केंद्राचे वेब कास्टींगव्दारे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया सुरक्षा कामी 1 पोलिस उपअधिक्षक, 1 पोलिस निरीक्षक, 14 सहा. पोलिस निरीक्षक, 201 पोलिस कर्मचारी व 112 होमगार्ड केंद्रीय सशस्त्र पोलीस दल 1 तुकडी, राज्य सशस्त्र पोलीस दल 1 तुकडी, सशस्त्र रक्षक 1 तुकडी,
निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहितेचे कामकाज सुव्यवस्थित चालू राहणेसाठी 4 फिरते पथक, 5 स्थिर पथक, 4 व्हीडीओ सर्व्हलन्स पथक व 2 व्हीडीओ पथक कार्यरत करण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहितेचे कामकाज सुव्यवस्थित चालू राहणेसाठी 4 फिरते पथक, 5 स्थिर पथक, 4 व्हीडीओ सर्व्हलन्स पथक व 2 व्हीडीओ पथक कार्यरत करण्यात आले आहे.
निवडणूक दिवशी एकूण 51 बस व 8 जीप मार्फत सर्व पथके मतदान केंद्रावर रवाना करणे व परत आणणेसाठी तयार करणेत आली आहे. मतदान 7 मे रोजी होत आहे. मतदार प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 36 सेक्टर ऑफीसर व 8 शिघ्र कृती दल कोणत्याही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था करणार आहेत.