उद्धवजींचा मानेचा पट्टा बघण्या पेक्षा, तुमच्या गळ्यातला गुलामीचा पट्टा बघा
फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांचे सडेतोड उत्तर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या पट्ट्यावरून खोचक टोला लगावला होता. त्यांच्या या टोल्याला आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीसांच्या या विधानाबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.उद्धवजींच्या मानेचा पट्टा बघण्या पेक्षा, तुमच्या गळ्यातला गुलामीचा पट्टा बघा” असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अखिल भारतीय नाट्य संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या मंचावरून फडणवीसांनी हा टोला लगावला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी,”परिस्थितीनुसार नाटक आणि सिनेमाची आठवण येते. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा पाहिला की, सिंहासन सिनेमाची आठवण येते. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल बोलतोय. हे सांगण्याची आवश्यकता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला आज संजय राऊतांनी उत्तर देत यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधेलला आहे. मानेवर पट्टा असेल तर तो आजार आहे. असा आजार कुणालाही होऊ शकतो. अमित शाह देखील आजारी असतात. नरेंद्र आजारी पडू शकतात. पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीच्या पट्टा आहे. तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधलाय. दिल्ली त्यांना खेळवत बसलीये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी याच कार्यक्रमात आणखी एक वक्तव्य केले होते, ‘2019 साली आमच्या पाठीत कट्ट्यार घुसली’ असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानावरही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांना 2024 नंतर नाटकं हेच करायचं आहे, त्यांना दुसरं काम काय आहे?, असे संजय राऊत याची यावेळी म्हटले
पुढे राज्यात सुरु असणाऱ्या तलाठी भरती प्रकरणावरूनही राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “पुरावा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी वाचवा. सत्य हा पुरावा आहे. संघ परिवार जर सत्य हा पुरावा मानत नसतील, तर त्यांनी कबर खोदावी. त्यांना काय पुरावे हवे आहे? उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही मराठे असल्याचे पुरावे द्या, असेही राऊतांनी म्हटले आहे.