उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का

संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर कला ओझा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान कला ओझा यांनी राजीनामा दिल्यानंतर अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही, त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत माजी महापौर कला ओझा यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. कोणत्याही दबावाने आपण हा राजीनामा देत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले असले तरी त्यांचा फोन संध्याकाळनंतर बंद होता. आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयकाची जबाबदारी त्यांच्यावर होती. ओझा या चंद्रकांत खैरे यांच्या गटातील विश्वासू पदाधिकारी होत्या.
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गटातील महिला आघाडीप्रमुख प्रतिभा जगताप यांनी देखील राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता कला ओझा यांनी राजीनामा दिल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीतील अस्वस्थता पुढे येत आहे. ओझा यांचा राजीनामा हा छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्का मानण्यात येत आहे. राजीनाम्यानंतर आता ओझा या काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.