क्राइमराज्यसातारा

दोन परदेशींसह नऊ जणांना पोलीस कोठडी

आत्तापर्यंत 12 जण अटकेत;  कराड (एम.डी.) ड्रग्ज प्रकरण ः पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

कराड : शहर परिसर व ओगलेवाडी येथे पोलिसांनी पाच दिवसापूर्वी (एम.डी.) ड्रग्जची विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. त्यावेळी त्यांच्याकडून सुमारे 10 ग्रॅम वजनाचे (एम.डी.) ड्रग्जसह तिघांना ताब्यात घेतले होते. या (एम.डी.) ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याने पोलिसांची तीन पथके मुंबईसह इतर ठिकाणी तपासास गेले होते. तपासासाठी गेलेल्या पथकाने मुंबईतून पाचजणांना तर कराडातून आणखी चार अशा नऊ जणांना ताब्यात घेऊन अटक केली. यामध्ये आणखी 20 ग्रॅम (एम.डी.) ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. यामध्ये मुंबईतून ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोन परदेशी संशयितांचा समावेश आहे.

अमित अशोक घरत (वय 31) रा. करांजडे ता. पनवेल जि. रायगड, दीपक सुभाष सुर्यवंशी (वय 43) रा. चाळीसगाव जि जळगाव, सध्या तुर्भे, मुंबई, बेंजामिन ॲना कोरु (वय- 44) रा. कोपरखैरणे नवी मुंबई, रोहित प्रफुल्ल शहा (वय 31) रा. शनिवार पेठ, माळी कॉलनी, कराड, सागना इ मॅन्युअल (वय 39) घणसोली नवी मुंबई, नयन दिलीप मागाडे (वय 28) रा. डोंबिवली पूर्व जि. ठाणे, प्रसाद सुनील देवरुखकर (वय 30) पावस्कर गल्ली, कराड, संतोष अशोक दोडमणी (वय 22) सैदापूर ता. कराड, फैज दिलावर मोमीन (वय 26) रा. मार्केट यार्ड, कराड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी तिघांना पोलिसांनी अटक केली असून (एम.डी.) ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत बारा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण सुमारे 30 ग्रॅम वजनाचे (एम.डी.) ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वी राहुल अरुण बडे (वय ३७) रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कराड, समीर उर्फ सॅम जावेद शेख (वय २४) रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका,  कराड, तौसीब चाँदसो बारगिर (वय २७) रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका, कराड या तिघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर व परिसरामध्ये (एम.डी.) ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यांच्या पथकाने चार दिवसापूर्वी कारवाई करून त्यामध्ये तिघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्याकडून सुमारे 10 ग्रॅम वजनाचे (एम.डी.) ड्रग्ज ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरविले. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात आणखी काही संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. यामध्ये डीवायएसपी कार्यालयाचे पथक, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक आणि उंब्रज पोलीस ठाण्याचे एक पथक असे तीन पथक तयार करण्यात आले. यामध्ये मुंबईला गेलेल्या पथकानी दोन परदेशी नागरिकांसह पाचजणांना मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून  ताब्यात घेतले. तर दुसऱ्या दोन पथकाने आणखी चार जणांना ताब्यात  घेउन  अटक केली.

अमित घरत, दीपक सुर्यवंशी, बेंजामिन कोरु, रोहित शहा, सागना इ मॅन्युअल, नयन मागाडे, प्रसाद देवरुखकर, संतोष दोडमणी, फैज मोमीन या नऊ जणांना अटक केली. पोलिसांनी आत्तापर्यंत सुमारे 30 ग्रॅम वजनाचे (एम.डी.) ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कराडमधील ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असून त्यांची माहिती पोलीस घेत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close