राजकियराज्यसातारा

माजी आमदारांनी यशवंत विचार पायदळी तुडवला : आ. मनोज घोरपडे

कराड ः यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राजकारण करत असलेले विद्यमान चेअरमन यांनी यशवंत विचार पायदळी तुडवला म्हणून त्यांना सर्वांनी माजी आमदार केले आहे. आता येणा-या कारखान्याच्या निवडणूकीत त्यांना माजी चेअरमन करायचे आहे. सहयाद्री कारखान्याची निवडणूक पक्षविरहीत होणार असून सर्वांनी एकजूट ठेवून सत्ताधा-यांचा करेक्ट कार्यक्रम करत सहयाद्री कारखान्यावर 100 टक्के परिवर्तन करणारच असा निर्धार कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला.तर आता  असा फुलटॉस टाकला आहे कि यांचा त्रिफळा उडवून दांडया व बॅट पण गुल  होणार आहे व 5 ते 7 हजारांच्या फरकाने विजय मिळवून सर्वसामान्य शेतकरी सभासदच कारखान्याचा चेअरमन होणार असल्याचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी केले.

ते मसूर येथे आयोजित सहयाद्री सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भव्य सभासद मेळाव्यास मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी कृषी सभापती भिमराव पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, कोयना संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, सहयाद्रीचे कामगार नेते नवनाथ पाटील, अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक बजरंग जाधव, माजी नगराध्यक्ष वासूदेव माने, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, सचिन जाधव, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष विश्वास जाधव, दिपक पिसाळ, निवासराव निकम प्रदीप साळुंखे, शहाजीराव देशमुख, राजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोज घोरपडे पुढे म्हणाले, सहयाद्रीच्या निवडणूकीसाठी मायक्रोप्लॅनिंग झाले असून आपण 5 ते 7 हजार मताधिक्कयाने निवडून येणार आहे. सभासद हा कारखान्याचा मालक आहे ख-या अर्थाने त्यांच्या हातात हा कारखाना देणार आहे व आपण त्याचे 100 टक्के पालकत्व स्विकारणार आहे.आपल्या परिवर्तन पॅनेलला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम तसेच सर्वपक्षीय मंडळीं एकत्र आली आहेत. कै. यशवंतराव चव्हाण यांनी या भागातील शेतकरी सभासदांसाठी या कारखान्याची निर्मिती केली परंतु यांनी या कारखान्यावर घराणेशाही चालवली आहे  कारखान्याचे चेअरमन वडील झाले  कि मुलगा आला आणि आता नातू आला आहे हे आपणाला संपवायच आहे.

विधानसभेला पडलयावर यांनी साखर फुकट केली परंतु ते एप्रिल फुल आहे.या कारखान्यात परिवर्तन होवून आता सर्वसामान्य सभासदच चेअरमन होतील व त्यांच्याकडूनच आम्ही फुकट साखर देणार आहे. कुणालाच शेअर्स दिले नव्हते मग तुमच्या चिरंजीवला पोटात असतानाच शेअर्स दिला होता का असा सवाल घोरपडे यांनी केला.

सह्याद्री कामगार नेते नवनाथ पाटील म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिल्ह्याची अर्थवाहिनी असून कारखान्याचे कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी मनोज दादांच्या पाठीशी राहणार.

हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ म्हणाले, खरे बोलणारा व काम करणारा माणूस म्हणून आत्ताच्या मेळाव्यात मी व सह्याद्री कामगार नेते नवनाथ पाटील आणि माझे काही सहकारी मनोज दादांच्या पाठीशी उभे राहिलो आहे अजूनही अनेक जण येण्याच्या तयारीत असून त्यांना आणन्याचे काम आपण नक्कीच करू.

वसंतराव जगदाळे म्हणाले, सह्याद्री कारखान्याचे मुख्य प्रवर्तक पी. डी. पाटील साहेब नव्हतेच तर आर. डी. पाटील आणि भिकू नाना किवळकर हेच मुख्य प्रवर्तक होते.

भिमराव पाटील म्हणाले, 18 ते 20 महिन्यांनी लागण जाणार खोडवा गाडी टाकून नेणार मजुरांना एकरी दहा हजार रुपये द्यायचे ट्रॅक्टरला मग बळीराजांनी कमवायचे काय असा सवाल करत आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे त्यासाठी वेसावद न राहता सर्वांनी एकत्र यावे.

यावेळी विजय सुर्यवंशी, सचिन जाधव, विश्वास जाधव, उमेश साळुंखे, सचिन शिंदे, डॉ. शंकरराव पवार, नवनाथ पाटील, सुभाष पाटील, पै. संतोष वेताळ, अधिकराव साळुंखे, संपतराव माने, संपतराव इंगवले, वासुदेव माने, वसंतराव जगदाळे, भिमराव पाटील आदींनी मनोगतातून सहयाद्री कारखान्याच्या कारभारावर ताशेरे ओढले.

प्रास्तावीक कराड तालुका शिवसेना उबाठा गटाचे माजी अध्यक्ष विनायक भोसले यांनी केले.सूत्रसंचालन दिपक साबळे यांनी केले. तर आभार सुरेश पाटील यांनी मानले.

मेळाव्यास कराड, कोरेगांव, सातारा, कडेगाव, खटाव या पाचही तालुक्यातील सहयाद्री कारखान्याचे सभासद व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close