मराठा आरक्षणला राज्य सरकार जबाबदार : खा. सुप्रिया सुळे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आज सोलापूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा काढली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं. तसंच सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांनी आयकर विभागाची नोटीस आल्याचंही सांगितलं. प्रत्येक वेळी सदानंद सुळे यांना नोटीस येते असं त्या म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? यावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचंच नाव घेतलंय. तर नाना पटोले यांनी त्यांच्याकडे नाव असेल तर सांगावं असंही म्हटलंय. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मात्र आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत अडकलो नाही. आम्ही सेवा करण्यासाठी राज्य सरकार आणणार आहोत असं सांगितलं.
मराठा आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठा आरक्षणला राज्य सरकार जबाबदार आहे. सरकार एक बोलते आणि आमदार एक बोलतात. महाविकास आघाडीची आरक्षण भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण प्रस्ताव आणा आम्ही तयार आहोत. समाज प्रचंड अस्वस्थ आहे. त्याला सरकार जबाबदार आहे.
सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, अजित पवार यांचे हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही. ते तुमच्याकडूनच ऐकत आहे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी हात जोडून राम कृष्ण हरी असं म्हटलं. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरही त्या बोलल्या. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, पुणे डीपीडीसीच्या निधीतून आमचं आणि अमोल दादाच वेगळं दुखणं आहे. त्यातून आम्हाला निधीच मिळत नाही. आम्ही तर लहान आहोत मात्र शरद पवार साहेबांना जर सांगितलं जात असेल खासदारांनी बोलायचं नाही.