
कराड : कराड तालुक्यात आयपीएल क्रिकेट सट्ट्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पोलिसांनी सुरवातीला ल्याव लिजावं टिमकी बजाव कारवाई केली. त्यावेळी मोठे बुकी भूमिगत झाले होते. त्यानंतर त्यांनी मंथली गोळा करणाऱ्यांच्या मदतीने पुन्हा शहरात व तालुक्यात आपले बस्तान मांडले आहे. यामध्ये तरुण आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सट्ट्यात गुंतले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पोलिसांची मंथली गोळा करणारी आणि बुकी यांची गां…,’ दोस्ती असल्याची चर्चा कराडात आहे. त्यामुळे अधिकारी जरी कारवाई करणार असले तरी मंथली गोळा करणारे पोलिस त्यांना अगोदरच टीप देऊन तालुक्याच्या बाहेर जायला सांगत असल्याचे प्रकार घडत आहेत.
इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू होऊन आता महिन्याचा कालावधी झाला आहे. तालुक्यात तसेच कराडात क्रिकेट सट्टेबाज आता चांगले सक्रिय झाले आहेत. यात दररोज कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत आहे. यामध्ये सट्टेबाज चांगलेच मालामाल झाल्याची चर्चा आहे. पोलिसांची आयपीएलच्या सट्टेबाजारावर नजर असून काही प्रमाणात कारवाई झाली आहे. पण गळाला छोटे मासे लागत असल्याने तालुक्यातील मोठे बुकी, सट्टेबाज अजूनही दूर आहे. तालुक्यातील काही नामांकीत बुकी भूमिगत झाले आहे. त्यामुळे संपूर्ण देवाण-घेवाणीचा खेळ आता फंटरवर सोडण्यात आला आहे. सट्टेबाजांनी निर्माण केलेली चेन पोलिस प्रशासन तोडण्यात अपयशी ठरले आहे. त्याला कारण ही पोलीसच आहेत. कारण पोलिसांचे हफ्ते गोळा करणारे आणि बुकी यांचे नाते घट्ट आहे. अधिकाऱ्यांना काहीही कळू न देता या वसुली वाल्यांनी बुकिना बाहेरच्या बाहेर मॅनेज केले असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये डीवायएसपी कार्यालय असो वा शहर पोलिस स्टेशन असो दोन्ही कार्यालयाचे वसुली गोळा करणाऱ्यांनी आपापसात संगनमत करून बुकिना मॅनेज करून मलई गोळा केली असल्याची चर्चा त्यांच्या साथीदाराकडून होत आहे.
कराड तालुक्यात युवा पिढी अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी सट्टेबाजीला ऊत आला आहे. यात मागील काही वर्षांपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेची भर पडली आहे. आयपीएल सट्टेबाजारात यंदा कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेकडो युवक यात भरभटली जात असल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र शहरी भाग तसेच ग्रामीण भागात दिसत आहे. आयपीएलची सुरुवात झाल्यापासून कोणत्या ॲपवर सट्टा लावायचा, कोण जिंकणार, कोणता संघ चांगला आहे. यासह अनेक चर्चा सध्या तरुणांमध्ये रंगत आहेत. तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारणतः दीड ते दोन महिने चालणार्या स्पर्धेतून सट्टेबाज चांगलेच मालामाल होत असल्याचे दिसत आहे. यात तरुण मंडळीसह व्यावसायिकसुद्धा गुंतल्या जात आहे. तालुक्यात सट्टेबाजीची पाळेमुळे रोवली आहे. गेल्या काही वर्षांपासून सट्टेबाजीतून कोट्यवधींची संपत्ती कमविणार्या बुकींकडे पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे.
पोलिस हताश हॉटेल बिअर बार फुल्ल…
आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान सट्टेबाजारावर पोलिसांचे लक्ष राहणार काय असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. मात्र, ऑनलाईन सट्टा चालत असल्याने पोलिसांचाही नाईलाज असल्याचे दिसून येत आहे. हॉटेल बिअर बारमध्ये ऑनलाईन सट्टा घेणे किंवा लावणी सुरू असल्याने त्यामध्ये बारमालकाचा फायदा आहे. त्यामुळे शहरात उशिरापर्यंत हॉटेल आणि बार सुरू असतात निवांत बसण्याचे ठिकाण म्हणून युवकांनी बार हॉटेलला पसंती आहे.
ही आहे सट्टेबाजाची संशयित नावे..
आयपीएल क्रिकेटच्या सामन्यातील प्रत्येक चेंडूवर सट्टा लावण्यात येते. जिल्हाभरात वेगवेगळ्या तालुक्यातील तरुण मुलांना हाताशी घेऊन हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळविल्या जात आहे. यामध्ये प्रामुख्याने अक्षा, प्रमोद, इरफान, दीपक, समीर, किरण, ओमकार, निसार, अमोल, अजित, किशोर आदी बुकींचे फंटर तालुक्यात पसरलेले आहे. अशा बुकीवर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुढील भागात……. मंथली वसुली करणाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी आयजी साहेब करणार का ?