
कराड : मलकापूर येथील नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या भूखंड घोटाळ्यामध्ये ज्या तक्रारीवरन गुन्हा दाखल झाला व त्याचा तपास एका अधिकाऱ्याकडे दिला गेला या अधिकाऱ्याने कागदपत्रांची योग्य ती शहानिशा केली आहे का? कशाच्या आधारे त्यांनी आठ जणांवर गुन्हा नोंद करून त्यातील फक्त दोघांनाच अटक केली. उर्वरित सहा लोकांना का अटक केली नाही यामध्ये कुठे पाणी मुरत आहे का? अशी चर्चा कराड शहरात ऐकावयास मिळत आहे.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित कराड या जमिनीच्या मिळकतीबाबत तक्रारी अर्जावरून दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याबाबत तपास अधिकारी यांनी खरच योग्यती चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे का? की याबाबत तपास अधिकारी यांनी सर्व कागदपत्रे न तपसता घाई गडबडीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे का? या गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या कागदपत्रांची सखोल पाहणी व चौकशी होऊन गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. याबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून योग्य ती चौकशी करणार का?
दयानंद बाबासाहेब गोरे यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरून आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु दयानंद बाबासाहेब गोरे यांचे सातबारा सदरी लागलेले नाव हे मृत्युपत्राच्या आधारे लागलेले आहे. परंतु मृत्युपत्रांमध्ये जोडलेल्या आयडेंटी पुराव्यामध्ये तसेच त्या मृत्युपत्राच्या आधारे तयार झालेल्या फेरफारमध्ये बाबासाहेब आनंदराव गोरे असे नाव नसून बाबासो अंतोबा गोरे असे नाव आहे. मग या दोन नावाच्या व्यक्ती एक असल्याबाबतचा कोणताही पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही. असे असताना दयानंद बाबासो गोरे यांचे सातबारा सदरी लागलेले नाव योग्य प्रकारे लागले आहे का? जर स्वतःचेच नाव चुकीच्या पद्धतीने लागले असेल तर त्या व्यक्तीस दुसऱ्यावरती तक्रार करण्याचा अधिकार आहे का? हे ही पहाणे महत्त्वाचे आहे.
तक्रारदार दयानंद बाबासाहेब गोरे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु याबाबत तपास अधिकारी यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याआधी काही मुद्द्यांची चौकशी झाली आहे की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. या मुद्द्यांची व कागदपत्रांची वरिष्ठ अधिकारी योग्य ती चौकशी करणार का? ते मुद्दे खालील प्रमाणे.
1) दयानंद बाबासो गोरे यांचे सातबारा सदरी ज्या मृत्युपत्राने नोंद करण्यात आली होती त्या मृत्युपत्राला आयडेंटी पुरावा कोणत्या व्यक्तीचा जोडलेला आहे याची पाहणी केलेली दिसून येत नाही. तसेच या मृत्युपत्राच्या आधारे जो फेरफार तयार झालेला आहे त्या फेरफार वरती ही मयत व्यक्तीचे नाव वेगळे दिसून येत आहे. याचीही पाहणी तपास अधिकारी यांनी केल्याची दिसून येत नाही.
2) तक्रारदार दयानंद बाबासाहेब गोरे यांनी मधुकर चवरे यांनी राजीनामा दिला असल्याबाबतचे पत्र सर्वत्र दाखल केलेले आहे. परंतु त्या पत्रावरील सही मधुकर चवरे यांचीच आहे हे तपास अधिकारी यांनी कसे काय मान्य केले. त्यांनी याबाबत फॉरेन्सिक रिपोर्ट आणलेला आहे का? की तक्रारदार सांगत आहे म्हणून त्यांनी ते सत्य मानलेले आहे का?
3) गृहनिर्माण संस्थेच्या जमिनी बाबत 2019 पासून महसूल खात्यामध्ये याबाबतच्या केसेस चालू होत्या 2019 च्या केस मध्ये दयानंद गोरे यांनी मधुकर चवरे यांनी राजीनामा दिला असून त्यांनी बनावट कागदपत्रे ठराव केलेले असल्याबाबत दयानंद गोरे यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये नमूद केलेले आहे. मग 2019 सालीच त्यांनी याबाबत अर्ज देऊन गुन्हा दाखल का केला नाही याची चौकशी तपास अधिकारी यांनी केली आहे का?
4) दयानंद बाबासाहेब गोरे यांना चेअरमन करताना 34 सभासद हजर होते. त्यापैकी 34 सभासद होते की त्यांच्यातील काही मयत सभासदांचे वारस होते याबाबत तपास अधिकारी यांनी चौकशी केली आहे का?
5) मयत सभासद यांना असणाऱ्या वारसांमध्ये एकाच वारसाला सभासद करून घेताना उर्वरित वारसांनी हक्क सोडपत्र अथवा रजिस्टर संमती पत्र करून दिलेले आहे की नाही याची चौकशी तपास अधिकारी यांनी केलेली आहे का?
6) जर मयत असलेल्या सभासदांच्या वारसांनी रजिस्टर हक्कसोड पत्र अथवा रजिस्टर संमती पत्र दिले नसेल तर ज्या वारसांना सभासद करून घेतलेले आहे ते योग्य आहे की नाही याबाबत तपास अधिकारी यांनी योग्य त्या कार्यालयाकडून पत्र व्यवहार करून मार्गदर्शन घेतले आहे का?
7) गजानन नागरिक पतसंस्था मलकापूर या पतसंस्थेने दयानंद गोरे यांच्या पत्नीच्या नावे त्यांच्या नावाची कोणतीही प्रॉपर्टी तारण न घेता सहकर्जदार म्हणून पंचवीस लाख रुपये चे कर्ज कसे काय दिले याबाबत तपास अधिकारी यांनी चौकशी केली आहे का?
8) रजिस्टर नसलेल्या नियोजित गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सभासदाला स्वतःचा हक्क दुसऱ्या व्यक्तीला विकता येतो का? याबाबत तपास अधिकारी यांनी योग्य त्या कार्यालयाकडून मार्गदर्शन घेतले आहे का?
9) मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीचे ओळख पत्रावरती चुकीच्या पद्धतीचे नाव असताना मृत्युपत्र कसे काय केले याबाबतची चौकशी तपास अधिकारी यांनी केली आहे का?
10) सातबारा वरती बाबासाहेब आनंदराव गोरे अशी नोंद असताना मयत बाबासो अंतोबा गोरे अशी चुकीच्या पद्धतीची नोंद मंडलाधिकारी यांनी फेरफार वरती कशी काय केली याबाबतची चौकशी तपास अधिकारी यांनी केली आहे का?
11) तक्रार अर्जावरून आठ लोकांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी दोन लोकांना अटक केली असून उर्वरित सहा लोकांना आजपर्यंत अटक का करण्यात आली नाही.
या सर्व मुद्द्याची व या मुद्द्याच्या अनुषंगाने असणाऱ्या कागदपत्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून योग्य ती चौकशी व्हावी तसेच अर्जावरून दाखल झालेला गुन्हा योग्य आहे की यामध्ये अजून कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो याचा खुलासा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून होणार का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या भूखंड घोटाळ्यामध्ये नक्की दोषी कोण आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो न्याय निवाडा करावा आणि जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर करावा. नाहीतर पोलिसांवर असलेला विश्वास जनतेच्या मनातून निघून जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पोलिसांनी सदरक्षणाय खलनिग्रनाय या ब्रीद वाक्याचा योग्य तो वापर करून या प्रकरणात लक्ष घालून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कराडसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.