
कराड : श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे आदर्श जुनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयातील एसएससी बोर्ड परीक्षेतील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार संपन्न झाला प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यालयाचा निकाल 90.71% लागला असून विशेष योग्यता पात्र 26 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये 58 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यालयातील अनुक्रमे प्रथम ओम सुनील जाधव 94.40%, आर्यन हणमंतराव साळुंखे 91.00%, तृतीय साई विलास शेलार 90.40%, चतुर्थ स्वप्निल प्रल्हाद जाधव 85.60%, पाचवा क्रमांक वैष्णवी जयवंत लावंड 84.00% या यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संपन्न झाला.
यावेळी त्यांनी शैक्षणिक नवीन प्रवेश प्रक्रिये विषयी माहिती सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले. शिक्षण घेण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातून येत असतात. सर्वांनाच प्रवेश दिला जातो असे संस्थेचे सचिव अशोकराव थोरात म्हणाले. तसेच विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे पर्यवेक्षक बी. जी. बुरुंगले, शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदर्श जुनियर कॉलेजच्या विभाग प्रमुख शिला पाटील व प्राध्यापक वर्ग तसेच सर्व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ए. एस. कुंभार यांनी विद्यालयाची गुणवत्ता विविध उपक्रम विविध स्पर्धां व नवीन प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विविध दाखल्यांविषयी माहिती
सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. तांबवेकर यांनी केले. पालकांनी गोंधळून न जाता आपल्या मुलाला कोणते शैक्षणिक क्षेत्र आवडते हे लक्षात घेऊन पुढील शिक्षणाचा प्रवेश निश्चित करावा असे विद्यालयाचे उप मुख्याध्यापक ए. बी. थोरात आभार मानताना म्हणाले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.
Tags
Karad SSC Result