राजकियराज्यसातारा

मनोजदादा हे खरे जल आणि जननायक : वसंतराव जगदाळे

निगडी येथे आ. मनोज घोरपडे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ

कराड ः कराड उत्तरचा दुष्काळ मिटवण्यासाठी अल्पावधीमध्ये  मनोजदादांनी हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजना, पाल इंदोली उपसा योजना, टेम्बू योजना, गणेशवाडी उपसा सिंचन योजना, समर्थ गाव सिंचन योजना, काशीळ उपसा सिंचन योजना, या सारख्या योजना पूर्णत्वासनेन्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल बघता ते खरे जलनायक आणि सर्वसामान्यांच्या प्रती काम करणारे जननायक आहेत असे गौरवोदगार वसंतराव जगदाळे यांनी काढले.
निगडी येथे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी हणबरवाडी धनगरवाडी योजनेसाठी 202.74 कोटी रुपयाची सुप्रमा केल्याबद्दल निगडी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने भव्यनागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महेश जाधव, संपतराव इंगवले, दिनकर पाटील, प्रदीप साळुंखे, कुलदीप क्षीरसागर, तुकाराम नलवडे, पुनमताई कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काम करत असताना अनेक विकास कामे रखडलेली होती अनेक पाणी योजना रखडलेल्या होत्या. प्रामुख्याने लोकांना पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याची व्यवस्था करणे  तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचून जनतेची कामे करणे हेच माझे कर्तव्य असून त्याच पद्धतीने काम करणार आहे. माझ्याकडे येण्यासाठी कोणालाही मध्यस्थीची गरज भासणार नाही याचे मी या ठिकाणी वचन देतो.

यावेळी बोलताना वसंतराव जगदाळे म्हणाले, आज पर्यंत कराड उत्तरचे नेतृत्व अनेक नेत्यांनी केले परंतु स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने जननायक म्हणून आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या रूपाने नेतृत्व मिळालेले आहे. माजी आमदारांनी गेली 25 वर्ष हणबरवाडी धनगवाडी योजना रखडवली होती. ती योजना केवळ 25 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ठेवले आहे. त्यामुळे त्यांना जलनायक म्हणणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जनता दरबाराच्या माध्यमातून आणि स्वतःच्या संपर्काच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य लोकांना भेटून त्यांची काम करण्याची पद्धत पाहता, मतदार संघातील लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत. जनसामान्यांचे नेते म्हणून त्यांचे नाव सर्व मतदार संघामध्ये आदराने घेतले जाते.

यावेळी रसिक पाटील, पवन निकम, संजय शिरतोडे, भीमराव घोलप, विजय घोलप, प्रशांत घोलप, मारुती घोलप, संदीप पानसकर, वैभव साळुंखे, संभाजी माने, अशोक जाधव, ओमकार जगदाळे, महेश चव्हाण, गणेश जाधव, सागर जगदाळे, संदीप चव्हाण, उमेश साळुंखे, चंद्रकांत पाटील, शिवाजी घोलप, लक्ष्मण घोलप, विनोद नेटके, किरण माने, सागर कुंभार, निवास घोलप, फर्स्ट घोलप, महेश पवार, सागर घोलप, उत्तम घोलप, पांडुरंग घोलप, रामचंद्र माने, शशिकांत घोलप, सुभाष घोलप, संभाजी माने, संतोष पाटील, कपिल पाटील, रमेश सुतार यांच्यासह निगडी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close