
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या जनता दरबारामध्ये महसूल, अभिलेख, वन विभाग सहकार, महावितरण, कृषी विभाग, ग्राम विकास, पशुसंवर्धन तसेच पोलीस स्टेशन बाबत तक्रारींचा प्रत्यक्ष आमदार मनोज घोरपडे यांनी त्वरित कार्यवाही केली.
यावेळी शासकीय अधिकारी कराडचे नायब तहसीलदार बी. के. राठोड, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांचेसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या जनता दरबारासाठी कोपर्डी हवेली व परिसरातील अनेक नागरिकांनी आपापल्या विभागाच्या गावच्या होणाऱ्या समस्या याबाबत आमदार मनोज घोरपडे यांच्यासमोर गाराने मांडले. यावर त्वरित आमदार महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या विशेषतः कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यात तेरावा जनता दरबार होत असून गेल्या दोन जनता दरबारातील काही प्रश्न प्रलंबित असल्याचे नागरिकांनी सुचित केल्यानंतर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य तत्पर राहावे असे सुद्धा सांगितले.
यावेळी पै. संतोष वेताळ, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, महेशबाबा जाधव, तुकाराम नलवडे, अमोल पवार, महेश चव्हाण, प्रकाश पवार, शैलेश चव्हाण, राहुल पाटील, सुभाष चव्हाण, राजन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
6 महिन्यात 13 जनता दरबार…अन् हजारो प्रश्न निकाली…!
कार्यसम्राट आमदार म्हणून मनोजदादा घोरपडे यांचा उल्लेख होत असून सर्वसामान्य लोकांसाठी धडपडणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळणारे आमदार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्याकडे पाहिले जाते. यानुसार त्यांनी दर पंधरा दिवसाला जनता दरबार आयोजित करून गेल्या सहा महिन्यात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कराड कोरेगाव सातारा व खटाव तालुक्यातील एकूण 13 जनता दरबार आयोजित करून हजारो सामान्य नागरिकांना शासनाच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. या विशेष कार्याबद्दल मतदारसंघातील सामान्य नागरिक मनोजदादांचे विशेष कौतुक करत आहेत.