भाजप सरकार दलिताला बोलू देत नाही
संसदेत मल्लिकार्जुन खर्गेनी उपस्थित केला सवाल

नवी दिल्ली : संसदेत घुसखोरीचा मुद्दा अजून शांत झालेला नाही. विरोधकांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून अनेक प्रश्न विचारल्यानंतर अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी, खासदारांच्या निलंबनाविरोधात आज इंडिया आघाडीच्या पक्षांनी जंतरमंतरवर निदर्शने केली.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हेही आंदोलनस्थळी उपस्थित होते.
“माझ्या जातीमुळे माझा अपमान होत आहे, असे राज्यघटनेतील उच्च पदावर असलेले लोक म्हणतात.. असं सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केली.खर्गे म्हणाले,तुमची ही अवस्था असेल तर माझ्यासारख्या दलिताची काय अवस्था असेल?
जेव्हा मी सभागृहात बोलायला उठतो, मला बोलण्याची संधीच दिली गेली नाही… मग हे भाजपचे लोक, भाजप सरकार दलिताला बोलू देत नाही, असं मी म्हणायचं का ? असा जळजळीत सवाल खर्गेंनी यावेळी उपस्थित केला.
संसदेच्या सुरक्षेबाबत माझे दोन प्रश्न आहेत असे म्हणत राहुल गांधींनी काही सवाल उपस्थित केले. तेर म्हणाले,”तरुण संसदेत कसे पोहोचले याविषयी दोन प्रश्न आहेत. पहिला म्हणजे सुरक्षेतील त्रुटी कशाप्रकारे घडल्या ? कारण तरुणांनी धूर नळ्या आणल्या असतील तर ते काहीही आणू शकले असते.
तरुणांनी विरोध का केला हा दुसरा प्रश्न आहे. बेरोजगारीच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले. देशातील इतर तरुणांचीही तीच अवस्था आहे. आज देशातील तरुण साडेसात तास इंटरनेट मीडियावर घालवत आहेत कारण नरेंद्र मोदी सरकार त्यांना रोजगार देत नाही.