ताज्या बातम्याराजकियराज्य

सांगली जिल्ह्यात जनावरांना जरी विचारले तरी ते सांगतील हा काँग्रेसचा जिल्हा : आ. विश्वजीत कदम

सांगली : काँग्रेसला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात हा पक्ष लढला. देशाच्या गावागावांत हा पक्ष आहे. सांगली जिल्ह्याच्या घराघरात काँग्रेस आहे. सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नका, अशा शब्दांत आमदार विश्वजीत कदम यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.

नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना विश्वजीत कदम यांनी आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली. विश्वजीत कदम यांचे विमान गुजरातच्या दिशेने भरकटू नये, असा टोला राऊत यांनी आज सकाळी सांगलीत हाणला होता. त्याला विश्वजीत यांनी दिल्लीतून सडेतोड उत्तर दिले. सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्रभर होईल, असा इशारा राऊत यांनी दिला होता. काँग्रेसला असला इशारा देऊ नका, अशा शब्दात विश्वजीत यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट झाली असून आज रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांची भेट आम्ही घेत आहोत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा निर्णय हाच आमचा निर्णय असेल. सांगलीबाबत कोणी परस्पर घेतलेल्या निर्णय आम्ही मान्य करणार नाही, अशा शब्दात त्यांनी स्पष्ट केले.

विश्वजीत म्हणाले, “सांगली जिल्ह्यात जनावरांना जरी विचारले तरी ते सांगतील हा काँग्रेसचा जिल्हा आहे. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम यांनी सांगलीच्या मातीत परिश्रम घेऊन महाराष्ट्रात हा पक्ष मोठा केला. संपूर्ण महाराष्ट्र या वाटचालीचा साक्षीदार आहे. विशाल पाटील यांच्या रूपाने आम्ही सांगलीत एक सक्षम उमेदवार देत आहोत. आम्ही सांगलीतून लढणार अशी भूमिका सातत्याने मांडली आहे. मुळातच सांगली ही काँग्रेसची आहे. त्याबाबत कोणी परस्पर निर्णय जाहीर करण्याचे कारण नाही. काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल आणि आधीच सांगितलेले आहे.”

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close