राज्यसातारा

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा

पाटण : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 04/03/2024 ते 10/03/2024 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन श्री.यशराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सर्व कर्मचारी आधिकारी या सर्वानी एकत्रित येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर मरळी येथे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेची शपथ घेतली.त्यांना ही शपथ कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी दिली.

यामध्ये सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेऊन आमच्या स्वत:च्या आमच्या कुटुंबाच्या, आपल्या कारखान्याच्या, समाजाच्या व आपल्या देशाच्या हितासाठी व रक्षणासाठी कारखान्यातील सर्व सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे व सूचनांचे पालन करू व आपल्या कारखान्यातील अपघात टाळणेसाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोतम प्रयत्न करू अशी शपथ घेतली.

याप्रसंगी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, संचालक अशोकराव पाटील, बबनराव शिंदे,लक्ष्मण बोर्गे, शंकर पाटील, शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, सुनिल पानस्कर, बळीराम साळुंखे तसेच पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग यावेळी  उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close