
कराड : कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील वाचकांच्या मनावर आदिराज गाजवणारे साप्ताहिक विश्व सिटी न्यूजच्य दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साप्ताहिक विश्वसिटी न्यूज चे संपादक गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन, पत्रकार शरद गाडे, संतोष वायदंडे, अस्लम मुल्ला, विशाल पाटील, अशोक मोहने, अजिंक्य गोवेकर, अमोल टकले, सुहास कांबळे, अक्षय मस्के, सुरेश जाधव, अक्षय देशमुख, हणमंत मोरे, रामदास मोरे यांच्यासह कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, आमचे स्नेही गणेश पवार यांनी थोडक्या कालावधीत साप्ताहिक विश्व सिटी न्यूज च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी साप्ताहिक विश्व सिटी न्यूज च्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांची या क्षेत्रातील वाटचाल यशस्वी व्हावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून सर्वांना दिनदर्शिका वाटप करण्यात आली.