
कराड ः येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटीच्या अपहारप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार होती. पोलिसांनी पुन्हा दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची आणखी पोलीस कोठडी सुनावली आहे.
शरद गौरीहर मुंढेकर व सुनील आनंदा काशिद (रा. हवेलवाडी-सवादे, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी गत महिन्यात याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवशंकर पतसंस्थेत 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 अखेरचे वैधानिक लेखा परिक्षण झाले. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत 13 कोटी 9 लाख 96 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका आहे.
याप्रकरणी शरद मुंढेकर, शंकर स्वामी, महादेव बसरगी, दिपक कोरडे, उमेश मुंढेकर, सतिश बेडके, मिलींद लखापती, मनोज दुर्गवडे, वृषाली मुंढेकर, सिंधू जुगे, शंकर घेवारी, सर्जेराव लोकरे, वसंत काळे, श्रीकांत आलेकरी, शिवाजी पिसाळ, महेश शिंदे, प्रेमलता बेंद्रे, महालिंग मुंढेकर, तात्यासासाहेब विभूते, शिवाजी मानकर, चंद्रकांत दुर्गवडे आदी संचालकांसह व्यवस्थापक रविंद्र स्वामी, कर्मचारी नितीन चिंचकर (रा. कालवडे), संग्राम स्वामी, सुभाष बेंद्रे (रा. रविवार पेठ, कराड), ज्ञानेश्वरी बारटक्के (रा. रविवार पेठ, कराड), दत्तात्रय शिंदे (रा. कोडोली) व सुनिल काशिद (हवेलवाडी-सवादे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी शरद मुंढेकर व सुनील काशिद यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड करीत आहेत.