
कराड : जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कोयना दूध संघाने विविध उपक्रम राबवून सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. ग्रामीण भागातील सहकारी दूध संस्थांना उपयोगी ठरेल अशी दिनदर्शिका प्रकाशित करून एक चांगला उपक्रम राबवला आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ऍड उदयसिंह पाटील यांनी केले.
कराड येथे कोयना दूध संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंदचे संचालक वसंतराव जगदाळे, प्रा. धनाजी काटकर बाजार समिती सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, माजी सभापती विजयकुमार कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, उपाध्यक्ष जगन्नाथ मोरे, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी शेवाळे, उपा उपाध्यक्ष सिद्धनाथ घराळ, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अँड. पाटील पुढे म्हणाले, माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे कोयना दूध संघासह बाजार समिती शामराव पाटील पतसंस्था रयत कारखाना खरेदी विक्री संघ या संस्थांनी भरीव प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचे काम संघाने केले आहे. दुग्ध व्यवसायाकडे फक्त व्यवसाय म्हणून न पाहता या व्यवसायाच्या माध्यमातून कोयना दूध संघाने यापुढेही असेच उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.
यावेळी संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, निवासराव निकम, संचालक बाबुराव धोकटे,सुदाम शिवाजी शिंदे दीपक पिसाळ, तसेच संभाजी चव्हाण दत्तात्रय सपकाळ सतीश इंगवले आधीसह बाजार समिती खरेदी विक्री संघ शामराव पाटील पतसंस्था रयत कारखाना कोयना दूध संघ आधी संस्थांचे संचालक रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
Karad Udaysinh patil