राज्यसातारा

कराडच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी जोरदार तयारी

कराड ः मराठा समाजाचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा कराड येथे १७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. त्यासंदर्भात पोलिस प्रशासन आणि मराठा समन्वयक यांची बैठक झाली. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत असुन सभेची तयारीही पुर्णत्वाकडे आली आहे.

मराठा समाजातील आबावलवृध्दांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे कराडला येत आहेत. त्यांच्या सभेसाठी कराड, पाटण, सातारा, खटाव, कडेगाव, शिराळा, तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. त्याचा विचार करुन नुकतीच पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक झाली. त्यात सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली. सभेसाठी गावोगावी जनजागृतीसाठी बैठका घेण्यात येत आहेत.
……………..
सभेसाठी असणारी पार्किंग व्यवस्था

सुरक्षेच्या दृष्टीने साई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम दक्षिण गेट रस्ता
तसेच विजय दिवस चौक ते बदियानी बंगला हा भाग नो पार्किंग राहील.

मसूर, ओगलेवाडीकडुन येणाऱ्यांसाठी

1) श्री नलवडे घर ते राम मंदिर टू व्हीलर पार्किंग
2)श्री गुजर घर ते राम मंदिर तसेच कॉटेज हॉस्पिटल भिंत टू व्हीलर पार्किंग
3) श्री एल सी शहा पारस बंगला ते कॉटेज हॉस्पिटल भिंत फोर व्हीलर पार्किंग
4) विरुंगळा बंगला ते एल आय सी ऑफिस दोन्ही बाजूस फोर व्हिलर पार्किंग
5) विरंगुळा बंगला ते श्री दिलीप जाधव बंगला दोन्ही बाजूस फोर व्हिलर पार्किंग
6) शिवाजी हायस्कूल फोर व्हिलर पार्किंग
7) विठामाता हायस्कूल टू व्हीलर पार्किंग
8) आंबेडकर ग्राउंड बुधवार पेठ फोर व्हिलर पार्किंग
9) श्री हॉस्पिटल समोर फोर व्हिलर पार्किंग (मोठ्या गाड्या ट्रक ट्रॅक्टर इत्यादी)
10) वाखान भागातील अंतर्गत रस्ते फोर व्हिलर पार्किंग
……………………………

वडगाव , कार्वे वाठार रेठरेकडुन येणाऱ्या वाहनांसाठी

1)उर्दू शाळा मैदान फोर व्हीलर पार्किंग
2) बैल बाजार मार्केट ग्राउंड फोर व्हिलर पार्किंग
3) कल्याणी मैदान मार्केट फोर व्हिलर पार्किंग
…………………………………………

उंडाळे, ओंड, विंगकडुन येणाऱ्या वाहनांसाठी

1) श्री पी. डी .पाटील साहेब उद्यान परिसर मार्केट यार्ड फोर व्हीलर पार्किंग
2) वॉटर सप्लाय परिसर पंकज लॉन शेजारी फोर व्हीलर पार्किंग
…………………………………………..
उंब्रज वारुंजीकडुन येणाऱ्या वाहनांसाठी

1) लाहोटी मैदान पंकज लॉन शेजारी
2)दैत्य निवारणी मंदिर परिसर फोर व्हीलर पार्किंग
3) साई मंदिर शिवतीर्थ दत्त चौक फोर व्हीलर पार्किंग

कराड शहरातील मराठा बांधवांचा स्तुत्य उपक्रम क्रांतीसूर्य मनोज जरांगे – पाटील यांचे सभेसाठी येताना सर्व बंधू भगिनी पायी चालत येणार आहेत.आणि आपल्या परगावाहून येणाऱ्या बांधवांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close