कृषीराज्यसातारा

कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमीपुजन संपन्न 

कराड : १८ वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन प्रतिवर्षी प्रमाणे दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेले आहे. प्रदर्शन स्थळावरील मंडपाचे भूमीपूजन सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशिल कदम, मनोज घोरपडे , रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील (दादा), माजी जि. प. प्रदीप पाटील, सागर शिवदास पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा.चेअरमन जगन्नाथ मोरे , कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई , व्हा.चेअरमन शिवाजीराव जाधव, कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील , व्हा.चेअरमन विजय मुठेकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला. रयत कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरुड , शामराव पाटील पतसंस्थेचे चेअमरन बळवंत पाटील,यावेळी बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, संचालक प्रकाश पाटील, उध्दवराव फाळके, संभाजी काकडे, सतिश इंगवले, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, जगत्राथ लावंड, जयंतीलाल पटेल, गणपत पाटील, संचालिका रेखाताई पवार, प्रभारी सचिव आबासो पाटील धनाजी काटकर, रामकृष्ण वेताळ, कृषिअधिकारी कोळेकर, तोरणे, मोहनराव माने, अशोक पाटील-पोतलेकर सचिन मोहिते, प्रमोद कणसे, शैलेश चव्हाण, वामनराव साळुंखे, महेशकुमार जाधव, पंजाबराव देसाई, तुकाराम पाटील, निवासराव निकम, डायनामिक इव्हेंटचे मॅनेजर निरज तिवारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रदर्शनाच्या मंडप व्यवस्थेची माहिती देताना निरज तिवारी म्हणाले, पिलरलेस डोममध्ये वॉटर फ्रुप मंडप उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये ४०० स्टॉल्स व स्वतंत्र पशु-पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच नविन तंत्रज्ञान युक्त स्टॉलचा समावेश असणार आहे. उंची मंडपामुळे मंडपात हवा खेळती राहणार आहे. मंडप व परिसरात सर्व सोई सुविधा असणार असून शेतकरी हित डोळया समोर ठेवून शेतकरी बांधवांसाठी १०० स्टॉल मोफत देण्यांत येणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close