
कराड: कापील येथील श्री बाल क्रीडा गणेश मंडळ श्रीरामनगर येथील बालचिमुकल्यानी दिवाळी सणानिमित्त हुबेहूब सिंहगड किल्ला बनविला. यावेळी ओम जाधव, कृष्णराज जाधव, पार्थ जाधव, अथर्व जाधव, ओमकार माळी, वेदांत जाधव, समर्थ जाधव, साई जाधव, इंद्रायणी जाधव, विघ्नेश जाधव, आदित्य जाधव, सिद्धांत जाधव, शिवराज जाधव, प्रथमेश जाधव, राज जाधव, हर्षवर्धन जाधव यांच्यासह आदींनी किल्ला बनवण्यासाठी परिश्रम घेतले.