
कराड : मागील वर्षीपासून साखरेचे भाव प्रति क्विंटल 3500 ते 4000 रुपये एवढे होते. आता 3800 च्या आसपास आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे साखरेपासून मिळणारे उतपन्न वाढले आहे. तसेच मळी, बगॅस, मॉलेसेस इत्यादी प्राथमिक उपपदार्थापासून मिळणारे उतपन्न चांगले आहे. उपपदार्थ सोडून साखर कारखान्यांनी इथेनॉल, डिसलरी, को जन सारखे द्वितीय उपपदार्थ निर्माण करुन चांगले उत्पन्न आहे. यामुळे साखर कारखानदारांनी ऊसाला एफआरपी अधिक 500 दर द्यावाअन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकडी संघटनेचे सचिन नलवड़े यांचा दिला आहे.
एफआरपी देवून साखर कारखान्याने जादा पाचशे रुपये देवू शकतात. पुणे जिल्ह्यातील माळेगांव, सोमेश्वर कारखान्यांनी साखर उतारा 11.90 असताना एफआरपी पेक्षा 460 ते 300 रुपये जास्त दिले आहेत. आपल्या भागातील साखर कारखान्यांचा साखर उतारा 12 च्या पुढे 12.60 पर्यंत असल्याने मागील वर्षाचे 500 रुपये देणे शक्य होणार आहे.
ऊस नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी कारखाने सुरु करण्यापूर्वी यावर्षीची आपली पहिली उचल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही कारखान्यांनी उचल जाहीर केली नाही. साखर आयुक्त यांनी साखर कारखान्यावर कारवाई करावी. अशी मागणी असणारे निवेदन कराडचे नायब तहसीलदार राठोड़ यांना दिले आहे.
यावेळी रयत क्रांतिचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवड़े, जेष्ठ शेतकरी नेते सुदाम चह्वाण, रयत क्रांतिचे सातारा जिल्ह्याध्यक्ष शिवाजी पाटील, युवक काँगेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव, रयतचे तालुकाध्यक्ष विशाल पुस्तकें, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार उपस्थित होते.
साखरेचे वाढलेले भाव पाहता कारखान्यांनी उसाला एफआरपीपेक्षा अधिक भाव देता येतो. गावोगावी बैठका घेवून लवकरच ऊस परिषद घेणार आहे. येत्या आठ दिवसात दर जाहीर न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेवून रयत क्रांति संघटना सर्व कारखान्यावर तीव्र आंदोलन करणार आहे. — सचिन नलवडे,
सदस्य, ऊस नियंत्रण मंडळ