
कराड : कराड शहर हा राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असणारा कराड शहर आहे. या कराड शहरांमध्ये सर्व महापुरुषांचे स्मारके आहेत, यापैकी बुधवार पेठ मध्ये असणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, सुमारे पन्नास वर्ष पूर्ण होत असताना या स्मारकासाठी वेगवेगळ्या संघटनाने वेळोवेळी स्मारकचे सुशोभीकरण करण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा कराड नगर परिषद या विषयाला गांभीर्याने घेत नसल्याने समता पर्व चे आनंदराव लादे व नवाजबाबा सुतार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन कराड नगरपरिषदेच्या प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी उदासिनता झटकुन येत्या 06 डिसेंबर पर्यंत पुतळा स्मारक सुशोभीकरण करण्यास सुरुवात करावी अन्यथा नाईलास्तव नगरपालिकेचे नाकर्तेपणा विरोधात समता पर्व च्या माध्यमातून 07 डिसेंबर 2023 पासून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहोत असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी व तातडीने पुतळा स्मारक सुशोभीकरण करून आम्हा समतावादी नागरिकांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी सो. कराड यांना समता पर्व संयोजन समिती चे आनंदराव लादे, नवाजबाबा सुतार, जावेद नायकवडी, सलीम पटेल, ॲड. धिरज जाधव, भुषण पाटील, रमजान मांगलेकर, समीर संदे, सिद्दीक बागवान यांनी दिले आहे.