पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन

तिरुमाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मोदींचे स्वागत केले.
पंतप्रधानांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. पीएम नरेंद्र मोदी यांनी तिरूमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
पीएम मोदी तीन दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते निवडणूक प्रचारादरम्यान सभेला संबोधित करणार आहेत. महबूबाबाद आणि करीमनगर येथे पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त तिरुमलाच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेनिगुंटा विमानतळ ते तिरुमला टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही कडक नजर ठेवण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हैदराबादमध्ये रोड शो देखील होणार आहे. ज्यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या काळात पीएम मोदी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील.