उद्धव ठाकरेंची अवस्था सहनही होत नाही, अन् सांगताही येत नाही अशी
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माजी मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता राज्य सरकारकडून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पण अनेक ठिकाणी पंचनामे होऊनही आर्थिक मदत पोहोचली नसल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत निशाणा साधला. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, “ज्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मंत्री देसाई म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या काळातही संकट आली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची, दोन हेक्टचा तीन हक्टर करण्याचा निर्णय घेतला. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, अजितदादाही लक्ष ठेऊन आहेत.
“शेजारच्या राज्यातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी विनंती केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका दिवसासाठी तिथे गेले आहेत, असंही मंत्री देसाई म्हणाले. पुढं बोलताना देसाई म्हणाले, उद्धव ठाकरेंना मला विचारायचं आहे, तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अतिवृष्टी झाली होती, मोठे नुकसान झाले होते त्यावेळी तुमचे मंत्रीच अगोदर तिथे गेले होते. अतिवृष्टी झाली आणि तुम्ही लगेच तिथे गेलात अस नाही झाले, असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.