
कराड ः येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशू पक्षी प्रदर्शनास लाखात शेतकरी भेटी देतात, ही बाब येथील कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन कराड कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील यांनी केले.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित 18 व्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार, सातारा जि.प.चे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी यावर्षीचे स्व. यशवंतराव चव्हाण शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन कराड तालुक्यातील चारुदत्त पाटील (रेठरे खुर्द), मच्छिंद्र फडदरे (बेलवाडी), संजय शेटे (काले), बाबुराव चव्हाण (कोपर्डे हवेली), तुकाराम डुबल (म्होप्रे) यांसह दहा शेतकर्यांना गौरविण्यात आले.
उदयसिंह पाटील म्हणाले, 18 वर्षांपूर्वी स्व. काकांनी कृषी प्रदर्शनची मुहूर्तमेढ रोवली. आज हे प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचले आहे. आज 10 लाखांहून अधिक शेतकरी भेटी देऊन माहिती घेतात, हे प्रदर्शनाचे फलित आहे. प्रदर्शनाच्या यशासाठी बाजार समितीबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व इतर सर्व विभागांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.
प्रास्ताविक शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, सूत्रसंचालन राजेंद्र जाधव, संचालक प्रकाश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिलराव मोहिते, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एम. मुल्ला, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, हणमंतराव चव्हाण, धनाजीराव काटकर, रमेश देशमुख, पुरस्कार प्राप्त शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजीपाले पीक स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक विभागून – हणमंतराव सुनार (पोतले-हादगा), हणमंत जाधव (कापिल-कण्ड चाकवत), बाहुताई जाधव (कापिल-काश कोथंबिर), संकेत कचरे (वाघटी-कप्प व सेंद्रीय मेथी), रोहिणी जाधव (कापिल करप-देशी चुका), व्दितीय क्रमांक विभागून – इंदूताई जाधव (कापिल-पालक), संतोषी जाधव (कापिल-माठ), किशोर नागणे (काळज/फलटण-देशी तांदळ), तृतीय क्रमांक – त्रिशला जाधव (कापिल-कडीपत्ता), दत्तात्रय जाधव (कायिक-शेवगा), रोहिणी गणेश पवार (करवडी-कोथंबिर), उत्तेजनार्थ क्रमांक – श्रवण जाधव (कापिल-भोपळा), राजवर्धन जाधव (करवडी-भाहू), धनाजी माळी (सुपने-टादगा), लालासो जाधव (तारळे/चरण-तांदळ).
फळभाजी पिक स्पर्धा निकाल
प्रथम विभागून – संजय गोखले (वडगाव हवेली-वांगी), अजय चव्हाण (विठ्ठललवाडी-फ्लॉवर), आदिनाथ चव्हाण (विठ्ठलवाडी-कवडे), सयाजी जिजाबा (पाटण-बनशेती), प्रकाश शिंदे (विखडे-टोमॅटो). द्वितीय विभागून – वैभव खरी (तडवळे-चवळी), जाधव (पाटण-मिरची), लक्ष्मण मन्दि (दोडका), तृतीय विभागून – उत्तमराव जगताप (वडगाव हवेली-भेंडी), लालालो जाधव (तारळे-वाल घेवडा), प्रशांत गदड (दोडका). उत्तेजनार्थ क्रमांक – आत्माराम शिंदे (कुठरे-झोपडा), अशोक बिचुकले (अहिरे/खंडाळा-शेवगा), राजाराम शिंदे (कराड-कार्ले).