
कराड : मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व पत्रकारांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामुळे आज सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात या तपासण्या होणार आहेत. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन कराड तहसीलदार मा. विजय पवार, कराड शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. प्रदीप सूर्यवंशी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.जे.शेडगे याच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यामुळे कराड शहर व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांनी या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित रहावे. व रुग्णालयामध्ये आपल्या सर्व तपासण्या करुन घ्यावयाच्या आहेत .
या होणार तपासण्या
सर्व पत्रकारांचा ईसीजी काढला जाईल. रक्त, लघवी आणि शुगर तपासणी. किडनी आणि लिव्हर तपासणी, डोळे, कान, दात तपासणी त्याबरोबरच छातीचा एक्सरेही काढण्यात येईल. एचआयव्ही, उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब याबाबतच्याही तपासण्या यावेळी करण्यात येणार आहेत, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन हि करण्यात आले असून, या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.
कराड शहर व परिसरातील पत्रकारांसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आज सोमवार दि. 4 – 12- 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघ व कराड तालुका डिजिटल मीडिया परिषद यांच्यावतीने करण्यात आले आहे.