
मुंबई ः जे आता बडबड करत आहेत ते लवकरच मोदींच्या चरणी लीन होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल पुढे आला असून तीन राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. संजय शिरसाट म्हणाले की, “हे लोकं ईव्हीएमचा घोटाळा झाला म्हणताहेत मग कर्नाटकमध्ये कशाचा आदेश होता? तिथे ईव्हीएम कसं चाललं नाही? कालबाह्य झालेले हे टोमणे ते पुन्हा पुन्हा ते रिपीट करत आहेत,“ असे ते म्हणाले.
तसेच “आता ते महानगरपालिकेच्या निवडणुका का रखडवल्या म्हणत आहेत. पण ग्रामपंचायतच्या निवडणुकीतही यांचा पराभव झाला आहे. जे केलं त्याचं काही कौतुक नाही आणि हे का केलं नाही असं ते म्हणतात. मुळात यांचं अस्तित्व शुन्य झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत कदाचित ते मोदींच्या चरणी लीन होतील. जे आता बडबड करत आहेत ते मोदींच्या चरणी लीन होतील,“ असे ते म्हणाले आहेत.