ताज्या बातम्याब्रेकिंगराज्य

देशात मोदींशिवाय पर्याय नाही

भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

रायगड ः तीन राज्यात भाजपने सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.

कर्जतमध्ये दोन दिवसाचं शिबिर घेतलं. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजत पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काहीजण लगेचच आरक्षण द्या अन्यथा मुंबईकडे येऊ म्हणत आहेत. परंतु टिकणारे आरक्षण देण्याच काम सुरू आहे. काहीजण गावबंदी आंदोलन करत आहेत त्यांना सांगणं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करू नये.

अजित पवरांनी यावेळी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार आहोत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close