क्राइमताज्या बातम्याराज्य
संसदेतील स्मोक बॉम्ब हल्ल्या प्रकरणी ललित झा च्या पोलीस कोठडीत वाढ

नवी दिल्ली : संसदेतील स्मोक बॉम्ब हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेला 5वा आरोपी ललित झा याची पोलीस कोठडी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जानेवारीपर्यंत वाढवली. तसेच पोलिसांना आरोपीच्या एफआयआरची कॉपी देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
21 डिसेंबर रोजी सागर शर्मा, नीलम, मनोरंजन डी आणि अमोल शइंदे यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील 6 आरोपींची मानसिक चाचणीही करण्यात येणार आहे. त्यांचे वागणे, सवयी आणि दैनंदिन वर्तवणूक यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व चाचण्या सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात येणार आहेत.