राज्यसातारासामाजिक

पाटण तालुक्यातील  दिव्यांगांना चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप

पाटण :  पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली केंद्र  व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पाटण पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, तसेच तालुक्यातील किशोरवयीन मुली आणि महिला भगिनींसाठी आरोग्य, तंत्रज्ञान आणि कायदेविषयक बाबींचे प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, यादृष्टीने कायम सहकार्य राहील, असे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांनी केले. पाटण पंचायत समितीच्या वतीने आयोजित आणि दिव्यांगांना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप आणि महिला प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मा. यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण यांच्यावतीने सुस्वाद हॉल  म्हावशी पेठ पाटण येथे दिव्यांगांना साहाय्यक साहित्य वाटप तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती  पाटणचे गट विकास अधिकारी श्री.गोरख शेलार, बाजार समिती सदस्य दादासो जाधव, नाना पवार, माजी जि.प. सदस्य बशीर खोंदू,  गणीभाई चाफेरकर, सलीमभाई इनामदार, इरफान सातारकर यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते,पंचायत समितीचे अधिकारी तसेच विद्यार्थीनी, महिला व दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांना रोजच्या वापरात येणारे व्हीलचेअर, बॅटरी सायकल, तीन चाकी सायकल हँड पॉप्रिलेड, स्मार्ट फोन, इलेक्ट्रिकल काठी व इतर साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिव्यांग बांधवासाठी  मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरु केल्याने दिव्यांग बांधवाना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.  आज दिव्यांग बांधवाना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील सुमारे ५५ लाख रुपयांचे हे साहित्याचा लाभ 770 बांधवाना होणार आहे. यावेळी  किशोरवयीन मुली व महिलांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संबोधित करताना मा. यशराजदादा देसाई म्हणाले की, या कार्यशाळेतून किशोरवयीन मुलींना व महिलांना पोषण, आरोग्य, कुटुंबनियोजन व कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. माता-भगिनींना  या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होईल. तसेच यापुढेही महिला वर्गासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाईल. आज स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. भविष्यात लोकसभेत व विधानसभेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळू शकते त्यामुळे    किशोरवयीन मुलींना व महिलांना कायद्याने दिलेले हक्क याची माहिती असणे आवश्यक आहे. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शानाखाली दिव्यांग व महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रमाचे माध्यमातून आवश्यक ते सहकार्य कायम करू, ते शेवठी बोलताना म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close