
कराड ः तेरा जाना दिल के अरमानों का लुट जाना ..दिल तडप तडप के..जाने क्युं लोग..वादा ना तोड..ये आयें देखकर..आखें तेरी बाहों मे ..अशा एका सरस एक सुमधूर गीतांनी स्व.लता मंगेशकर यांना व्दितीय पुण्यस्मरण दिली आदरांजली वाहण्यात आली.
कराड येथील रफी-लता फॅन्स क्लब व मोहंमद रफी म्युझिक अॅकॅडमी यांच्या वतीने स्व. लता मंगेशकर यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून मेरी आवाज ही पहचान है या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील
यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये हा कार्यक्रम झाला.
तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, अर्बन बझारच्या उपाध्यक्ष जयश्री गुरव, महागुरू असिफ बागवान, महंमद अनिस, विश्वराज उद्योग समुहाचे गणेश पवार, सीटी क्विनच्या विमल पाटील, वनिता कदम, जयश्री देशमुख, श्वेता ज्वेलरीचे मालक विजय कदम, श्वेता कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
लता मंगेशकर यांच्या निवडक आणि लोकप्रिय गीतांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. हम थे जिनके सहारे, पिया तो सें, तस्वीर तेरी दिल में, आजा सनम, दिल पुकारे..ही गाणी आपल्या सुरेल आवाजात जमिला मुलाणी, नलिनी बैले यांनी सादर केली. त्यांना असिफ बागवान,महंमद अनिस यांनी साथ केली. जाने क्युं लोग, तुझे बुला यें, हम को हमी से.. ही गिते स्मीता पवार यांनी तेवढ्याच ताकदीने सादर केली. ये आखें देखकर, देखा एक ख्वाँब ही गिते जमिला मुलाणी व अशोक मोहने यांनी तर दिल तो पागल है, आखें तेरी बाहो में..ही गिते गितांजली मोहिते व संजय साठे यांनी उत्कृष्ट सादर केली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकाडाटात उत्स्फूर्त दाद दिली. टाऊनहॉल गर्दीचे खचाखच भरला होता.