ताज्या बातम्याराजकियराज्य

मी घरी बसणारा नाही तर लोकांमध्ये जाणारा मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

नागपूर : शिवसेनेशी गद्दरी करून भाजपच्या मदतीने संपूर्ण पक्ष आणि चिन्ह पळवणारे एकनाथ शिंदे कायम उद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. त्याला ठाकरे गटाकडून प्रतिउत्तर दिले जाते.

शिंदे विरूद्ध ठाकरे वाद हा मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये रविवारी झालेल्या मेळाव्यात ठाकरे यांना लक्ष्य केले.

२०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांना दोन वर्षे करोनाच्या साथीमुळे व स्वतःच्या आजारपणामुळे पूर्ण क्षमतेने काम करत आले नाही. त्यांनी बराच काळ घरुनच काम केले. याचा संदर्भ देत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. ते पेन चालवत नव्हते, माझ्याकडे दोन पेन असून त्यातील शाई सुध्दा संपते. कारण त्याचा वापर सुद्ध अधिक होतो. मी घरी बसणारा नाही तर लोकांमध्ये जाणारा मुख्यमंत्री आहे. रस्त्यावर, गाडीत फाईलवर स्वाक्षरी करतो मुख्यमंत्री सहाय्यता निधीची फाईल मागे ठेवत नाही. पण हे त्याना सहन होत नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधी पक्ष करीत आहे, पण त्यांची सत्ता असताना गृहमंत्री कारागृहात गेले होते, कंगणा राणावतचे घर तोडण्यात आले होते.

खासदार नवनीत राणांना, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी का केली नाही? महायुतीला राज्यात बहुमत असून सरकार भक्कम आहे, असे शिंदे म्हणाले. नेहमीप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली. शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचे असे सांगून ते स्वत:च झाले. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली म्हणून आम्ही वेगळी भूमिका घेतली, त्याला लोकांचे समर्थन आहे, आता ते रोज आमचा बाप चोरला, पक्ष चोरला म्हणून रडत आहेत, माझ्यावर रोज टीका केली जाते, ‘दाढी खेचून आणले असते’ असे म्हणतात पण माझ्या नादाला लागू नका ‘मी जर काडी फिरवली तर लंका जळेल’, असा इशारा शिंदे यांनी दिला. मी घरून काम करणारा नाही तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा, सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्याचे त्यांना पाहावले नाही म्हणून ते आमच्यावर टीका करीत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close