कराड ः निवडणुक पूर्व कालावधीत कराड पोलीस उपविभागाकडून बुधवार पेठ येथे सोमवारी रात्री कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये 37 माहितगार गुन्हेगारांच्या हालचाली पडताळल्या, तर नाकाबंदी करून 244 वाहने चेक करून 10 संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली. तर चौघांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढलेली गुन्हेगारी कमी करणेसाठी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री 7 ते 10 या वेळेत शहरातील बुधवार पेठ येथे कोंबिग ऑपरेशन व नाकाबंदी ऑपरेशन करीत शहरातील 37 माहितगार गुन्हेगारांच्या हालचाली पडताळण्यात आल्या. तर चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर काही तडीपार गुन्हेगारही चेक करण्यात आले. तर तिघांवर सीआपीसी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच मटका जुगाराच्या दोन कारवाया करण्यात आल्या. यामध्ये 4 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ताडी विक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून अडीच हजार रूपये किमतीची 50 लिटर ताडी जप्त करण्यात आली. प्रतिबंधात्मक दोन कारवायाही करण्यात आल्या. चार भटक्या टोळ्याही चेक करण्यात आल्या. तसेच नाकाबंदीसाठी दोन ठिकाणे नेमली होती. त्यामध्ये 244 वाहने तपासण्यात आली. त्यामध्ये 14 संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली असून 92 जणांवर कारवाई करत 70 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व 5 पोलीस अंमलदार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक अझर शेख, पतंग पाटील, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, सुर्यवंशी व 10 पोलीस अमंलदार, कराड शहर पोलीस ठाण्याचे 50 पोलीस अमंलदार, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मस्के व 25 पोलीस अमंलदार, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व 5 पोलीस अमंलदार, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व 5 पोलीस अमंलदार, मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व 5 पोलीस अमंलदार असे एकूण 19 पोलीस अधिकारी व 105 पोलीस अमंलदार यांनी केली.

Tags
crime news Karad Satara