
कराड ः धंद्यात पार्टनरशिप दे, धंद्यात मिळणारे निम्मे पैसे मला दे, लय मस्ती आली आहे का असे म्हणत एकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करत खंडणी मागणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडास कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले.
रोहीत राजेंद्र काटवटे (रा. भोई गल्ली, कराड) असे ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डवरील गुंडाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील शाहू चौक परिसरात सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रोहित काटवटे याने फिर्यादीस धंद्यात पार्टनरशीप दे, धंद्यात मिळणारे निम्मे पैसे मला दे, लय मस्ती आली आहे का असे म्हणून हातातील चाकुने वार केला. तो चाकुचा घाव फिर्यादीने चुकविला त्यावेळी त्याने फिर्यादीला लाथ मारून खाली पाडुन आजचे धंद्याचे पैसे मला दे असे म्हणुन फिर्यादीचे अंगातील शर्टाचे वरील खिशातील व्यवसायातुन मिळालेले 5,400 रुपये जबरदस्तीने काढुन घेतले व शिवीगाळ दमदाटी करुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रोहीत काटवटे हा फरार झाला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक, के. एन. पाटील यांनी फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व डी. बी. टीमला आदेश दिला होता. त्याप्रमाणे फरार झालेला आरोपीची गोपनीय बातमी दारांकडुन माहीती मिळवुन पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्मागरी पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पो. अंमलदार महेश शिंदे हे करीत आहेत.