ताज्या बातम्याराजकियराज्य

मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

मुंबई  : मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही सविस्तर माहिती दिली. मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवलाय. ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडणूक लढवा. एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी आमचा पाठिंबा असेल, असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवलाय, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ओबीसीच्या ताटातले आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगाच विशेष अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्याव लागेल. हे फसव राजकारण आहे का? कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे, की त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे.

मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. सरकारने त्यांना अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचं अश्वासन दिले. लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

40 जागांचं आमचं सेटेलमेंट झालं. आमची शेवटची बैठक झाली, त्यामध्ये आम्ही फायनल मसुदा दिला. त्यामध्ये इतर पक्षांचा मसूदा आला असेल. तर पुढील बैठकीत जागावाटपावर फायनल चर्चा होईल. कोणाला कुठल्या जागा हव्या आहेत ते एका कागदावर लिहू आणि कोणाच्या काय मागण्या आहेत ते सोडवू. जो निर्णय सुटणार नाही त्याचा सगळे बसून निर्णय घेऊयात. दोन्ही गोष्टींवर आता काय चर्चा होती, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी रिंगमास्टर आहे. मोदींना ज्यांना नाचवायचं ते नाचवतील. जे तयार होणार नाहीत, ते भाजपमध्ये जातील, असे मी आधीच सांगितलं होतं, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजकारणाचा स्तर खालावला आहे. टीका अतिशय खालच्या पातळीला होत आहेत. सत्ताधाऱ्यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत लोक नवं पाणी भरतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close