रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले चैतन्य नागमल यांचे कौतुक

नवी दिल्ली : देशाचे कार्यक्षम मंत्री ज्यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी आहे; अशा नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे भेट घेण्यात आली. शेतकरी कुटुंबातील चैतन्य गणेश नागमल या कमी वयाच्या शास्त्रज्ञाने बनवलेल्या अपघात सूचक प्रणालीचे प्रात्यक्षिक परिवहन खात्याची जबाबदारी असलेल्या नामदार श्री. नितीनजी गडकरी यांच्यासोबत झाले. सदर प्रकल्पाचे नितीनजी गडकरी यांनी कौतुक केले व मार्गदर्शन केले. त्यांनी चैतन्याला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अथवा टू व्हीलर च्या कंपनीत सोबत हा प्रस्ताव मांडावा असे सांगितले. व नंतर कंपन्यांनी ते सेन्सर बसवण्यासाठी विनंती केली तर ते तातडीने परवानगी द्यायला तयार आहेत व त्याची ते NOC देऊ शकतात असे सांगितले.
अपघात झाल्यानंतर ही सूचक प्रणाली घरच्यांना तातडीने कॉल,SMS, गुगल मॅप वर लाईव्ह लोकेशन पाठवायचे काम करते. व कॉल उचलल्यानंतर अपघात झालेल्या ठिकाणी जे काय घडत आहे ते कॉल च्या माध्यमातून ऐकू शकतो व या अपघात सूचक प्रणालीला पुन्हा पुन्हा रिसीट करण्याची गरज लागत नाही, ही माहिती योग्य वेळात मिळाल्यामुळे लोकांचे प्राण वाचू शकतात. ही अपघात प्रणाली 2 व्हीलर सोबत 4 व्हीलरला सुद्धा अत्यंत उपयोगी आहे व सर्वसामान्य ग्राहकाला ते परवडेल एवढ्याच किमतीची आहे ; आणि अपघाताबाबत जागृत असलेल्या मंत्री महोदयांनी याबाबत चांगले सहकार्य करण्याची भूमिका घेतली व Indian Book of Records मध्ये नाव नोंद झाल्याबद्दल त्यांनी ते सर्टिफिकेट देऊन चैतन्याचे पुन्हा एकदा अभिनंदन केले. यावेळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक व नितीनजी गडकरी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मित्र दिलीप मेदगे हे उपस्थित होते. व त्यांच्या माध्यमातून सदर भेट घेतली गेली. मंत्री महोदयांनी चैतन्याच्या प्रकल्पाची चांगली प्रशंसा करून ते त्यांना सहकार्य करायला तयार आहेत असे सांगितले. व चैतन्य गणेश नागमल यांच्या प्रकल्पाला मदत करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत चैतन्य गणेश नागमल याला जे 12 पेटंट मिळालेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा नितीन गडकरींनी गौरव उद्गार काढले. चैतन्य गणेश नागमल हा कराड तालुक्यातील SGM कॉलेज येथे शिकत आहे त्याच्या या कार्यासाठी तहसीलदार विजय पवार, रविकिरण पाटील, विशाल पाटील व पंचायत समिती कराड यांनी त्याला मार्गदर्शन केले. चैतन्य ला पुढील वाटचालीस शुभेच्छा व त्याचे हार्दिक अभिनंदन.