
कराड : आगाशिवनगर येथे साठ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली.स्वप्निल सुधाकर देसाई (रा.इंद्रप्रस्थ कॉलनी, आगाशिवनगर) यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देसाई हे पत्नी व मुलीसह आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मधील लक्ष्मी कांचन अपार्टमेंट मध्ये राहत आहेत. ते त्यांची पत्नी व देसाई हे रोज सकाळी साडेदहा वाजता कामानिमित्त बाहेर जातात. त्यानंतर घरातील साफसफाई व धुणे भांडी करण्यासाठी दोन महिला कामासाठी येतात. 16 जानेवारी 24 रोजी सकाळी साडेदहा वाजता कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी सहा वाजता घरी आले असता. त्यांनी लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता त्यामध्ये अर्ध्या तोळा वजनाचे वीस हजार किमतीचे सोन्याचे वेडन नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर घरामध्ये चार दिवस शोध घेतला. मात्र ते काही मिळून आले नाही. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2024 रोजी देसाई त्यांची पत्नी व मुलगी हे फिरावयास बाहेर गेले होते. तीन मार्च 2024 रोजी ते रात्री घरी परतले. त्यांनी घरातील कपाटातील ड्रावर चेक केला असता त्या दागिन्यांमध्ये ठेवलेले चाळीस हजार रूपये किमतीची सोन्याची चैन नसल्याचे निदर्शनास आले. घरात सर्वत्र शोध घेतला असता सोन्याची चैन कुठेही मिळून आली नाही. दोन्ही वेळेस सोन्याचे दागिने गेल्यानंतर देसाई यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे.