ताज्या बातम्याराजकियराज्य

मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं होतं, भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत

चिपळूण : मी लढतो आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीच आहे. परंतु मला मंत्रीपद मिळालेले नाही. गटनेतेपद मिळालेले नाही. यापुढेही मिळणार नाही, हे मला माहीत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं होतं. मिळणे हा माझा हक्क होता, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, बऱ्याच दिवसानंतर सर्व सहकारी एकत्र आले आहेत. यश मिळवायचे असेल तर डावपेच आखले पाहिजेत. माझ्या निवडणुकीची मी काळजी करत नाही. सेनेला सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत नेणं कर्तव्य आहे. बहुतांश खासदार हे चिपळूणमधून झालेत. सहकाऱ्यांच्या पाठीमागे नेहमी उभा राहिलो. संघर्षाची वेळ असते तेव्हा उभा असतो. मी संघर्षावेळी स्वत: मैदानात उतरतो. चिपळूणमध्ये शिवसेना उभी करणं हे मोठं आव्हान होते.

संघर्षावेळी भाड्याने माणसं आणत नाही. विक्रांतच्या नियोजनामुळे डोळे भरुन आले. मी कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. माझी भाषा आक्रमक आहे. कुणाला दुखावलं नाही. केंद्रीय पक्षाचे लोक बॅनरवरून धमक्या देतात. चुकीला माफी नाही, बदला घेतला जाईल असे भाजपचे बॅनर होते. संभ्रम दूर करणं गरजेचं आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मी जामीन घेतला. चिपळूणमधील राड्यावेळी पोलिसांकडून दबाव आला. मी स्वत: सांगत होतो मला अटक करा.

घरभेदी संभ्रम निर्माण करतायत. काय गरज होती भास्कर जाधवांनी सिंधुदुर्गात जाऊन बोलण्याची असे म्हणताय. जे रस्त्यावर उतरले त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. हा आमचा नाही हा भास्कर रावांचा आहे. त्याला बाहेर काढा त्याला नको. हे कोण सांगत होते? चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत मी हे पहिल्यांदा पाहिले.

पोलीस सध्या लाचार झाले आहेत. ड्रेस म्हणून ते पोलिस. आपण संपवलं होतं. आपले सगळे लोक पांगले होते. या घटनेला पोलीस जबाबदार आहेत. वरुन सारखे फोन येत होते. सगळं झाल्यानंतर एडीशनल एसपी आले. मी पोलीस स्टेशनला गेलो मला अटक करा, माझ्या लोकांना करु नका असं सांगितलं होते. कोणाचं नेतृत्व स्विकारायचं ते तुम्ही ठरवा. पहिल्यांदा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जामीन घेतला.

पक्ष फुटल्यानंतर कुणाला गटनेते करायला हवे होते? विधानसभेत कुणाचा आवाज आहे? मी बाकीच्याप्रमाणे माझ्या निष्ठेचे किस्से कुणालाही सांगत नाही. पण आज सांगायची वेळ आली आहे. तुम्ही कुठेही जा. पण तुम्ही भाजप सोबत गेला तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नाही. हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आज भास्कर जाधव लढतोय तो पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी, असे त्यांनी म्हटले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close