
कराड : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी ठार झाला. कराड-तासगाव मार्गावर येथील मार्केट यार्डमध्ये सहकार भवनसमोर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडा राजाराम कांबळे (रा. किरपे, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्डमधील सहकार भवनसमोर सुमारे चाळीस वर्षीय पुरूष रस्ता ओलांडत होता. त्यावेळी तासगाव बाजुकडून कराडकडे निघालेल्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरने (क्र. एमएच ११ जी ००९९) संबंधित पादचाºयाला धडक दिली. त्यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या मदतीने नागरीकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.